माधुरी दीक्षित: तिच्याकडून शिकाव्यात अशा 5 प्रोफेशनल गोष्टी

By admin | Published: May 15, 2017 04:18 PM2017-05-15T16:18:04+5:302017-05-15T16:38:50+5:30

माधुरी दीक्षित नावाचा ब्रॅण्ड सांगतो यशाचे ५ मंत्र

Madhuri Dixit: 5 professional things to learn from her | माधुरी दीक्षित: तिच्याकडून शिकाव्यात अशा 5 प्रोफेशनल गोष्टी

माधुरी दीक्षित: तिच्याकडून शिकाव्यात अशा 5 प्रोफेशनल गोष्टी

Next

- अनन्या भारद्वाज
माधुरी दीक्षितचा आज 50 वा वाढदिवस. माधुरी नावाची अनेकांच्या दिल की सुंदर धडकन आज पन्नाशीची झाली यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही. ती आजही तितकीच सुंदर दिसते. तिचं एक स्माईल, तिची एक झलक तिच्या करिअरच्या सुवर्णकाळाची याद करवून देते. तिची ती ‘मोहिनी’ आजही कायम आहे. मात्र माधुरीच्या करिअरकडे, तिच्या वाटचालीकडे पाहून काही गोष्टी नक्की प्रोफेशनल स्किल्स म्हणून शिकायला हव्यात. प्रत्यक्षातली म्हणजेच पर्सनल आयुष्यात माधुरी जगण्याचा कसा विचार करते हे माहिती नसलं तरी तिच्या बॉलिवूडच्या करिअरकडे पाहून काही गोष्टीं सॉफ्ट स्किलसह प्रोफेशनल स्किल्स म्हणून पहायला हव्यात. माधुरीची लाईफस्टाईलही त्या गोष्टी ठळकपणे दाखवते. आजच्या कार्पोरेट करिअरच्या जगात आणि आपलं काम हाच आपला ब्रॅण्ड असं अधोरेखीत करण्याच्या जगात या गोष्टींवर एक नजर घालायला हवी..

१) स्माईल प्लीज

तुम्ही कितीही मोठे स्टार असा, मोठा ब्रॅण्ड असा, तुमचा भूतकाळ कितीही मोठा असो, तुम्हाला वर्तमानात पुन्हा पुन्हा स्वत:ला सिद्ध करावं लागतंच. माधुरीनं कमबॅक केलं तोवर काळ पुढं सरकला होता. टेक्निकल गोष्टीच नाही तर बॉलिवूड सर्वार्थानं पुढं सरकलं होतं. सिनेमाची निवड चुकली तिची. कमबॅक यशस्वी झालं नाही. पण म्हणून ती हरली नाही, ती कमबॅकचे प्रयत्न वेगवेगळ्या टप्प्यातून करतेच आहे. टीव्ही शो, जाहिराती यातून तिचं अस्तित्व तिनं टिकवून धरलं आहे. कमबॅकचा स्ट्रगल कुणालाही चुकत नाही, तो करण्यात चूकही काही नाही, याचं अजून मोठं कुठलं उदाहरण हवं?

Web Title: Madhuri Dixit: 5 professional things to learn from her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.