तुम्ही करिना कपूरचा वन-स्लीव ब्लॅक पॅन्ट लूक पाहिलात का? 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 04:56 PM2019-07-26T16:56:56+5:302019-07-26T17:05:48+5:30

बॉलिवूडची फॅशन क्वीन, फॅशनिस्ता आणि फॅशन आयकॉन अशा गोष्टींची चर्चा होते, तेव्हा या लिस्टमध्ये सर्वात पहिलं नाव करिना कपूरचं येतं.

Fashionista kareena kapoor wore one sleeved black pant suit | तुम्ही करिना कपूरचा वन-स्लीव ब्लॅक पॅन्ट लूक पाहिलात का? 

तुम्ही करिना कपूरचा वन-स्लीव ब्लॅक पॅन्ट लूक पाहिलात का? 

Next

बॉलिवूडची फॅशन क्वीन, फॅशनिस्ता आणि फॅशन आयकॉन अशा गोष्टींची चर्चा होते, तेव्हा या लिस्टमध्ये सर्वात पहिलं नाव करिना कपूरचं येतं. करिनाने बॉलिवूडमध्ये अनेक ट्रेन्ड सेट केले आहेत. मग रेड कार्पेट लूक असो किंवा एअरपोर्ट लूक, कॅज्युअल लूक असो किंवा हॉलिडे लूक. प्रत्येक ठिकाणी करिनाचे आउटफिट्स आणि लूक्स वेगळे आणि हटके असतात. 

आपली चिक स्टाइल आणि फॅशन स्टेटमेंट्ससाठी ओळखली जाणारी करिना कपूर काही दिवसांपूर्वी लेडी बॉस लूकमध्ये दिसून आली.

करिनाने ब्लक कलरचा पॅन्टसूट वेअर केला होता. आता तुम्ही विचाराल की, यामध्ये काय खास आहे? करिनाचा हा ब्लॅक पॅन्टसूट फार सिंम्पल होता. पण याची खासियत म्हणजे, वन-स्लीव लूक. 

करिनाने ब्लॅक कलरच्या वाइड लेग्ड पॅन्टसोबत जे ब्लेजर वेअर केलं होतं, त्यामध्ये फक्त वन साइड फुल स्लीव्स होतं. जे दुसऱ्या बाजूला स्लीवलेस होतं. ब्लेजरचं  प्लंजिंग नेकलाइन होतं. नो-एक्ससरीज लूकमध्येही करिना फार क्लासी दिसत होती. 

प्रसिद्ध फॅशन डिझायनर निखिल थंपीने करिनाचा वन-स्लीव पॅन्टसूट डिझाइन केला आहे. ज्यामध्ये ती हॉट आणि सेक्सी दिसत आहे. तिच्या हेअरस्टाइलबाबत बोलायचं झालं तर, करिनाने सिम्पल वेणी बांधली आहे.

 एवढचं नाहीतर न्यूड लिपस्टिकसोबत फक्त आय मेकअप कॅरी केला आहे. करिनाचा हा लूक तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.

पाहूयाच करिनाचे आणखी काही हटके लूक्स : 

 

Web Title: Fashionista kareena kapoor wore one sleeved black pant suit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.