सध्या बॉलिवूडमध्ये अनेक स्टार किड्स पदार्पणाच्या तयारीत आहेत. अशातच जान्हवी, सारा यांच्या डेब्यूनंतर आता चर्चा आहे ती, अनन्या पांडेची. अनन्याने करण जोहर निर्मीत 'स्टुडंट ऑफ द इयर 2' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे. डेब्युनंतरच्या पहिल्या चित्रपटातच अनन्याची फॅनफॉलोइंग वाढली आहे. एवढचं नाहीतर अनेक तरूणांच्या गळ्यातील ती ताईत बनली आहे. 

अनन्या पांडे बीटाउनमधील सर्वात तरूण अभिनेत्रींपैकी एक. अनेक फिमेल फॅन्स स्टायलिश अनन्याचे लूक्स कॉपी करताना दिसतात. मग तो तिचा पार्टी लूक असो किंवा कॅज्युअल लूक. कोणत्याही लूकमध्ये अनन्या भारी दिसते. 

काही दिवसांपूर्वी अनन्या ब्राइट यल्लो कलरच्या स्वटशर्टमध्ये दिसून आली. हे स्वेटशर्ट तिने रिप्ड जीन्स आणि व्हाइट स्नीकर्ससोबत मॅच केली होती. तिने ही कॅज्युअल आणि स्टायलिश लूक अगदी हटके पद्धतीने कॅरी केला होता. मान्सूनमध्ये ब्राइट कलरचे कपडे फार सुंदर दिसतात. तुम्हीही अनन्याचा हा लूक ट्राय करा. 

तुम्हाला अनन्याचा हा लूक ट्राय करायचा असेल तर अजिबात चिंता करू नका. कारण हा बनाना लोगो असणारा स्वेटशर्ट बजेटमध्ये आहे. लेज ओफ कंपनीचा हा टर्टलनेक स्वेटशर्ट 65 डॉलरचा आहे. म्हणजेच, भारतीय किंमतीमध्ये जवळपास 4 हजार 600 रूपयांचा आहे. 

स्वेटशर्ट खरेदी केल्यानंतर तुम्ही अनन्याचा लूक कॉपी करू शकता. किंवा शॉर्ट स्कर्ट, शॉर्ट्स किंवा डार्क कलरच्या डेनिमसोबत स्वेटशर्ट कॅरी करू शकता. कोणत्याही लूकमध्ये हा स्वेटशर्ट तुम्हाला फार सुंदर दिसेल. 

पाहा अनन्याचे काही क्लासी लूक : 


Web Title: This cool yellow colour banana logo sweatshirt of ananya panday is totally in your budget
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.