बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस आणि त्यांचे आउटफिट्स नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. अशातच बऱ्याचदा अभिनेत्रींचे आउटफिट्स सारखे होतात. कधी त्यांचा पॅटर्न सारखा असतो, तर कधी कलर सेम असतो. अनेकदा तर अगदी तंतोतंत सारखेच असतात. असं का होतं हा प्रश्न अनेकदा तुमच्याही मनात आलाच असेल. पण यामागे एक कारण आहे, ते म्हणजे, अनेकदा या हिरोइन एकाच डिजायनरचे आउटफिट्स वेअर करतात. पण त्यातल्यात्यात एक गोष्ट वेगळी असते, ते म्हणजे हे आउटफिट्स कॅरी करण्याची पद्धत. अनेकदा आउटफिट वेगळे असले तरिही त्यांची स्टाइल वेगळी असते. आज आम्ही तुम्हाला अशाच दोन अभिनेत्रींबाबत सांगणार आहोत. ज्यांनी एकच आउटफिट वेगवेगळ्या पद्धतींनी वेअर केला आहे. या अभिनेत्री म्हणजे, स्टार किड्समधील अनन्या पांडे आणि श्रद्धा कपूर. 

श्रद्धा आपल्या आगामी चित्रपटात प्रभाससोबत स्किन शेअर करणार आहे. काही दिवसांपूर्वी श्रद्धाने एका मॅगझिनसाठी फोटोशूट केलं. मॅगझिनच्या कव्हरवर Michael Kors च्या मल्टीकलर्ड हाय-वेस्ट प्लीटेड स्कर्टमध्ये ती दिसून आली. त्यासोबत तिने Zara चा सीकुइन नूडल स्ट्रॅप टॉप वेअर केला होता. हा टॉप मल्टीकलर होता. लूक कम्पीट करण्यासाठी तिने स्ट्रॅप सॅडल्स आणि चोकर वेअर केल्या होत्या. श्रद्धाने केलेला न्यूड मेकअप आणि ग्लॉसी लिप्स तिचा लूक आणखी बहरवण्यासाठी मदत करत होते. तसेच त्यासोबत श्रद्धाचे मोकळे केस अगदी सुंदर दिसत होते. 

दुसरीकडे अनन्या पांडने हाच स्कर्ट आपल्या पहिला वहिला चित्रपट 'स्टूडंट ऑफ द इयर 2' च्या प्रमोशन दरम्यान वेअर केला होता. तसेच तिने या स्कर्टसोबत रेनबो कलरचे हेव्ही सीकुन्ड टॉप वेअर केला होता. तिने या आउटफिटवर कोणतीही एक्ससरीज कॅरी केल्या नव्हत्या. त्याचबरोबर व्हाइट स्नीकर्स वेअर केले होते. अनन्याने हलका मेकअप केला होता, तिचे पिंक लिप्स लक्ष वेधून घेत होते. 

तसं पाहायला गेलं तर दोघींचेही लूक्स क्लासी होते. तसेच त्यांनी ज्याप्रकारे ते कॅरी केले होते, तेसुद्धा हटके होतं. या दोघींकडून खरचं शिकण्यासारखं आहे की, एकच आउटफिट दोन प्रकारे कसं कॅरी करता येऊ शकतं. 


Web Title: Ananya pandey and shraddha kapoor look beautiful in multi coloured pleated skirt
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.