बॉलिवूडची चुलबूली अभिनेत्री आलिया भट्ट सध्या आपली अपकमिंग फिल्म 'कलंक'च्या प्रमोशनमध्ये बीझी आहे. पण प्रमोशनदरम्यान ती प्रत्येक इव्हेंटमध्ये हटके आणि क्लासी लूकमध्ये दिसून येत आहे. आपल्या लूक्समुळे चाहत्यांना नेहमीच घायाळ करणाऱ्या आलियाचे हे लूक्सही तिच्या फॅन्सच्या पसंतीस पडत आहेत. मंगळवारी झालेल्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये आलिया भट्टने साडी परिधान केली होती.

तिचा हा ट्रेडिशनल अंदाज चाहत्यांना भलताच आवडला असून सध्या आलियाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हारल होत आहेत. पाहूयात आलियाचे आकर्षक फोटो...

आलिया भट्टद्वारे शेअर करण्यात आलेल्या फोटोंमध्य तुम्ही पाहू शकता की, तिने पिंक आणि ग्रीन कलरच स्टायलिश साडी परिधान केली आहे.

ही साडी नॉर्मल साडीपेक्षा हटके असून डिझायनर तरुण तहिलियानी यांनी डिझाइन केलेली आहे. या साडीवर आलियाने रेड स्लीवलेस ब्लाउज वेअर केला आहे. ज्यामुळे आलिया आणखी सुंदर दिसत आहे. 

पिंक आणि ग्रीन डिझाइनचं कॉम्बिनेशन असलेली साडी फ्रिल्समध्ये डिझाइन करण्यात आली आहे. पारंपारिक साडीप्रमाणेच या साडीचा पदर आहे आणि तो आलियाचा एक शोल्डर कव्हर करत आहे. याव्यतिरिक्त तिचा एक शोल्डर ओपन आणि मागील बाजूस बॅकलेस लूक आहे. ज्यामुळे साडीमध्येही आलियाचं सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे.

आलियाने साडीवर फक्त एक मांगटिका वेअर केला असून तिने कानामध्ये किंवा गळ्यामध्ये काहीच वेअर केले नाही. या सिम्पल आणि क्लासी लूकमध्ये आलिया खरचं फार गोड दिसत आहे. 

आलिया भट्टच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाले तर ती लवकरच 'कलंक', 'ब्रम्‍हास्‍त्र', 'तख्त' आणि प्रसिद्ध बाहुबली चित्रपटाचे दिग्दर्शक  एस.एस.राजामौली यांचा चित्रपट 'आरआरआर' यांसारख्या धमाकेदार चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पाहूयात आलियाचे चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानचे हटके लूक्स :


Web Title: Alia bhatts saree look viral during promotion of upcoming kalank movie
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.