बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री आलिया भट्ट आपल्या अभिनयासोबतच आपल्या फॅशन स्टाइल्ससाठीही ओळखली जाते. मग आलियाचा रेड कार्पेट लूव असो किंवा एखादा प्रमोशनल इव्हेटं. आलिया आपल्या स्टाइलबाबत नेहमीच कॉन्शिअस असते. आलियाच्या फॅशनची सर्वात खास गोष्ट म्हणजे, तिची स्टाइल सिम्पल पण हटके असते. त्यामुळे कोणीही ही स्टाइल अगदी सहज फॉलो करू शकतो. आता तुम्ही तिची जिप्सी स्टाइलच पाहा. 

आलिया भट्टने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती मरून कलरच्या जिप्सी ड्रेसमध्ये दिसून आली आहे. या ड्रेसवर असलेल्या ट्रेडिशनल व्हाइट प्रिंटमुळे ड्रेस आणखी सुंदर दिसत आहे. ड्रेसच्या बॉर्डरवर गोल्डन डिझाइन आहे, जो प्लेट्ससोबत फॉललाही सुंदर लूक देण्याचं काम करतोय. 

या मरून ड्रेसमघ्ये कंबरेवर बेल्टही आहे. ज्यामुळे प्लेट्सचा फॉल आणखी सुंदर दिसण्यास मदत होते. ड्रेसचे स्लीव्स बलून स्टाइलमध्ये आहेत. ज्यामध्ये वन साइड ऑफ शोल्डर डिझाइन आहे. 

हाय हिल्स आणि डँगलर्स

आलियाने या ड्रेससोबत रेड कलरच्या हाय हिल्स कॅरी केल्या होत्या. ज्या तिच्या लूकला पूर्ण करतात. कानामध्ये तिने सुंदर डँगलर्स वेअर केले होते. याची युनिक डिझाइन फार अट्रॅक्टिव आहे. याव्यतिरिक्त आलियाने इतर काहीच ज्वेलरी वेअर केली नव्हती. 

मेकअप 

आलियाने एकदम लाइट मेकअप केला होता. तिने न्यूड मेकअप ऑप्ट केलं असून लिप्स आणि डोळ्यांसाठी लाइट पिंक कलर निवडला होता. आयब्रोला तिने ब्राउन पेन्सिलने लूक दिला होता. केसांना तिने वेवी लूक दिला असून ते मोकळेच ठेवले होते. आलिया या लूकमध्ये फआर सुंदर दिसत होती. 

दरम्यान, सध्या आलिया आगामी चित्रपट कलंकच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात आलियासह माधुरी दीक्षित, वरूण धवन, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा यांसारखी तगडी स्टार कास्ट असणार आहे. तसेच कलंकशिवाय आलियाचा ब्रम्हास्त्र हा चित्रपटही काही दिवसामध्येच रिलिज होणार आहे. यामध्ये आलियासोबत रणबीर कपूर स्क्रिन शेअर करणार आहे. सध्या आलिया आणि रणबीरच्या अफेअर सध्या बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

तुम्ही आलियाचे हे लूकही समर सीझनसाठी ट्राय करू शकता...


Web Title: Alia bhatts gypsy dress is perfect for summer fashion
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.