90च्या दशकातील ज्वेलरी ट्रेन्ड 2019मध्ये पुन्हा धुमाकूळ घालत आहे. आम्ही चोकर किंवा मूड रिंग्सबाबत बोलत नाही, तर आम्ही लेयर्ड नेकलेसबाबत बोलत आहोत. बरोबर ऐकलत तुम्ही... लेयर्ड नेकलेस 90च्या दशकातील फेमस फॅशन आहे. ज्यामध्ये गळ्यात वेगवेगळ्या साइज, शेप आणि डिझाइनचे नेकलेस किंवा पेन्डंट असणारे लॉन्ग चैन वेअर करण्यात येतात. आता या लॉन्ग लेयर्ड नेकलेसने पुन्हा फॅशन विश्वात एन्ट्री केली आहे. दिशा पाटनीपासून कतरिना कैफ आणि बॉलिवूड न्यू कमर अनन्या पांडेपर्यंत सर्वांनी लेयर्ड नेकलेस ट्रेन्ड फॉलो करण्यास सुरुवात केली आहे. 

दिशा पाटनी 

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री दिशा पाटनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती ब्यू डेनिम, व्हाइट प्लेन क्रॉप टॉप आणि मॅचिंग डेनिम जॅकेटमध्ये दिसून आली. या फोटोचं वैशिष्ट्य म्हणजे, वेगवेगळ्या शेप आणि साइजचे नेकलेस जे दिशाने गळ्यामध्ये वेअर केले होते. 

कतरिना कैफ 

सलमान खानचा बहुचर्चित चित्रपट भारतच्या प्रमोशन दरम्यान अभिनेत्री कतरिना कैफही  हा लेयर्ड नेकलेस ट्रेन्ड फॉलो करताना दिसून आली. कतरिना ब्लू कलरच्या मोनोटोन पॅन्टसूटसोबत 3 लेयर असणारा नेकलेस वेअर केला होता. त्यामुळे कतरिनाचा वेगळाच अंदाज पाहायला मिळत होता. 

अनन्या पांडे 

बॉलिवूडची नवी ट्रेन्ड सेटर अनन्या पांडेही काही दिवसांपूर्वी लेयर्ड नेकलेस ट्रेंडमध्ये दिसून आली. अनन्याने व्हाइट आणि ब्लू कलरचा एक शॉर्ट ड्रेस वेअर केला होता. तसेच तिने केस मोकळे सोडले होते. एक्ससरिजचं म्हणाल तर, तिने गळ्यामध्ये लेयर्ड नेकलेस वेअर केला होता. या लूकमध्ये अनन्या फार सुंदर दिसत होती. 

प्रियांका चोप्रा

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राही स्वतःला या ट्रेन्डपासून दूर ठेवू शकली नाही. पति निक जोनाससोबत तिनेही गळ्यामध्ये लेयर्ड नेकलेस वेअर करून पोज दिली आहे. 

दीपिका पादूकोन

बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी बॉलिवूडची मस्तानी दीपिकाही हा ट्रेन्ड फॉलो करताना दिसून आली. कान्स फेस्टिव्हलमध्ये केलेल्या एका लूकसाठी दीपिकाने लेयर्ड नेकलेस वेअर केला होता. इतरवेळीही दीपिका लेयर्ड नेकलेस वेअर करताना दिसून येत. 

 


Web Title: 90s trend of layered necklace is back do include it in your jewelry list
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.