WhatsApp: व्हॉट्सॲपवर तीन लाल टिक खरंच येणार का? व्हायरल मेसेजमागील सत्य काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 06:13 AM2021-05-31T06:13:16+5:302021-05-31T06:13:34+5:30

माहिती-तंत्रज्ञानविषयक नवीन नियम (आयटी रूल्स) अंमलात आल्यानंतर आता व्हॉट्सॲपवर येणाऱ्या मेसेजेसवर मोठ्या प्रमाणात निर्बंध येणार आहेत, सरकारची नजर या मेसेजेसवर राहणार आहे, सरकारची बदनामी करणारे संदेश अग्रेषित केले तर लगेचच कारवाईचा दंडुका बसणार आहे इ. इ. डझनभर सूचना असलेला एक मेसेज सध्या व्हॉट्सॲपवर व्हायरल होत आहे.

fact check Will there really be three red ticks on WhatsApp | WhatsApp: व्हॉट्सॲपवर तीन लाल टिक खरंच येणार का? व्हायरल मेसेजमागील सत्य काय?

WhatsApp: व्हॉट्सॲपवर तीन लाल टिक खरंच येणार का? व्हायरल मेसेजमागील सत्य काय?

Next

माहिती-तंत्रज्ञानविषयक नवीन नियम (आयटी रूल्स) अंमलात आल्यानंतर आता व्हॉट्सॲपवर येणाऱ्या मेसेजेसवर मोठ्या प्रमाणात निर्बंध येणार आहेत, सरकारची नजर या मेसेजेसवर राहणार आहे, सरकारची बदनामी करणारे संदेश अग्रेषित केले तर लगेचच कारवाईचा दंडुका बसणार आहे इ. इ. डझनभर सूचना असलेला एक मेसेज सध्या व्हॉट्सॲपवर व्हायरल होत आहे. मात्र, हा मेसेज खोटा असल्याचे स्पष्ट होत आहे...

काय म्हटले व्हायरल मेसेजमध्ये?
२ निळ्या रेषा व १ लाल रेष म्हणजे सरकार तुमच्याविरोधात कारवाई करू शकते. ३ लाल रेषा म्हणजे सरकारने तुमच्याविरोधात कारवाईला सुरुवात केली आहे
सरकारची बदनामी करणारा मेसेज अग्रेषित केला तर मूळ संदेश कोणाकडून आला याची चौकशी केली जाईल. धार्मिक द्वेष पसरवणारा मेसेज व्हायरल केला तर तुम्हाला अटक होईल.
तुमचे सर्व कॉल्स रेकॉर्ड केले जाणार आहेत. तुमचा मोबाइल थेट केंद्रीय मंत्रालयाच्या यंत्रणेशी जोडला जाणार आहे.

अनेकदा अग्रेषित झालेला हा मेसेज खरा आहे?
नाही, व्हायरल झालेला मेसेज खोटा आहे. हा निव्वळ खोडसाळपणा असून असे कोणतेही निर्बंध व्हॉट्सॲप युझर्सवर लागू होणार नाहीत. व्हॉट्सॲप युझर्सना भीती दर्शवणारा हा मेसेज गेल्या वर्षीही व्हायरल झाला होता

व्हॉट्सॲप युझर्सला कोणताही धोका नाही
संबंधित संदेश व्हायरल झाला असला 
तरी त्यात काही तथ्य नाही.  कारण व्हॉट्सॲपने संदेश देवाणघेवाणी संदर्भातील कोणतेही नवीन नियम आणलेले नाहीत.  त्यामुळे दोन निळ्या रेषा आणि एक लाल रेष वगैरेच्या संदेशापासून युझर्सनी निश्चिंत रहावे
एक रेष म्हणजे तुमचा मेसेज पाठवला गेला. दोन रेषा म्हणजे तो संबंधिताकडे पोहोचला. आणि दोन निळ्या रेषा म्हणजे संबंधित व्यक्तीने तो मेसेज वाचला, हेच कायम राहणार आहे
व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम तुमची छायाचित्रे, मेसेजेस, फाइल्स आणि इतर माहिती त्यांच्या स्वार्थासाठी वापरणार असल्याचा एक मेसेज गेल्या वर्षी व्हायरल झाला होता. मात्र, तो खोटा असल्याचे नंतर स्पष्ट झाले होते

- व्हॉट्सॲपवरील मेसेज कोणीही वाचू शकते का?
व्हॉट्सॲपवर दोन व्यक्तींमधील चॅटिंग गोपनीयच राहते
व्हॉट्सॲपला एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन सुविधा आहे
त्यामुळे व्हॉट्सॲपवर तुम्ही दुसऱ्या कोणाला पाठवलेला मेसेज, फोटो, व्हॉइस मेसेज, डॉक्युमेंट्स, स्टेटस अपडेट्स केवळ व्हॉट्सॲपच नव्हे तर फेसबुक किंवा सरकारही पाहू वा वाचू शकत नाही
त्यामुळे नव्या आयटी रूल्सच्या अंमलबजावणीनंतर आपल्या चॅटिंगवर गदा येणार आहे, अशी भीती युझर्सनी बाळगू नये

Web Title: fact check Will there really be three red ticks on WhatsApp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.