Coronavirus Fact Check :  कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा लहान मुलांना सर्वाधिक धोका?; BMC च्या व्हायरल मेसेजचं जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 02:55 PM2021-03-31T14:55:20+5:302021-03-31T14:56:08+5:30

Coronavirus Fact Check : आता मुंबई महापालिकेनं (BMC) ट्विट करत व्हायरल होत असलेला संदेश खोटा (Fake) असल्याचं सांगत स्पष्टीकरण दिलं आहे.  

Coronavirus Fact Check : New strain of corona puts children at greater risk ? know truth about BMC's viral message | Coronavirus Fact Check :  कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा लहान मुलांना सर्वाधिक धोका?; BMC च्या व्हायरल मेसेजचं जाणून घ्या सत्य

Coronavirus Fact Check :  कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा लहान मुलांना सर्वाधिक धोका?; BMC च्या व्हायरल मेसेजचं जाणून घ्या सत्य

Next

कोरोना व्हायरसनं (CoronaVirus) पुन्हा एकदा राज्यभरात धुमाकूळ घातला आहे. मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांतून हादरवणारी आकडेवारी समोर येत आहे. लसीकरणाला सुरूवात झाल्यानंतर तसंच लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर लोकांमध्ये दिलासादायक वातावरण होतं. कारण गेल्या अनेक महिन्यांपासून लोक आपल्या कुटुंबासह घरात बंद होते. मात्र आता पुन्हा एकदा रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे भीतीचं वातावरण पसरलं आहे. पुन्हा लॉकडाऊन लागणार का? व्हायरसच्या नव्या स्ट्रेनची लक्षणं अधिक तीव्र आहेत का? सगळ्यात जास्त धोका कोणाला? असे अनेक प्रश्न लोकांना पडत आहेत. अशा स्थितीत अनेक अफवा परसरवल्या जात असल्याचं दिसून आलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनचा लहान मुलांना जास्त धोका असल्याचा संदेश व्हायरल  होत आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली . त्यात असं नमूद करण्यात आलं होतं की, ''कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणं जाणवत नसली तरी लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर संक्रमित करत आहे. त्यामुळे आम्ही अशी विनंती करतो की, लहान मुलांना मोकळ्या जागेत  खेळायला पाठवू नका, तुमच्यासह मॉल्स किंवा इतर ठिकाणी घेऊन जाऊ नका.''

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक; समोर आली नव्या स्ट्रेनची लक्षणं

आता मुंबई महापालिकेनं (BMC) ट्विट करत व्हायरल होत असलेला संदेश खोटा (Fake) असल्याचं सांगत स्पष्टीकरण दिलं आहे.   ''सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली पोस्ट खोटी आहे. नागरिकांनी ही पोस्ट इतरत्र शेअर करू नये. आम्ही नागरिकांना विनंती करतो की ,त्यांनी शासनानं दिलेल्या कोरोनाच्या गाईड लाईन्सचे पालन करत शहराला व्हायरसशी लढण्यासाठी मदत करावी.'' असे या  ट्विटमध्ये नमुद केले आहे.  अरे व्वा! पुढच्या काही आठवड्यात भारताला मिळणार तिसरी कोरोना लस; भारतीय कंपनीचा दावा

Web Title: Coronavirus Fact Check : New strain of corona puts children at greater risk ? know truth about BMC's viral message

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.