वन संपदा राखतायत धरणातील पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 11:32 AM2021-03-23T11:32:06+5:302021-03-23T11:37:43+5:30

पश्चिम घाट प्रदेश हा दऱ्याखोऱ्यांचा आणि घळींचा प्रदेश आहे. अशा प्रदेशांतच धरणांची निर्मिती झाली आहे. या धरणांच्या दोन्ही बाजुला वनाच्छादन असल्याने जमिनीची धुप झाली नाही. ही झाडं या परिसरात नसती तर प्रत्येक पावसात धरणांत माती साठून शंभर टीएसमी क्षमता असणारं धरणं गाळाने भरून गेलं असतं. हे वनांनी केलेलं सर्वात महत्वाचं आणि मोठं काम असल्याचं पर्यावरण तज्ज्ञ सांगतात.

Water from the dam while preserving forest resources! | वन संपदा राखतायत धरणातील पाणी!

वन संपदा राखतायत धरणातील पाणी!

Next
ठळक मुद्देवन संपदा राखतायत धरणातील पाणी! जमिनीची धूप होण्यापासून मिळतेय रक्षण

प्रगती जाधव-पाटील

सातारा : पश्चिम घाट प्रदेश हा दऱ्याखोऱ्यांचा आणि घळींचा प्रदेश आहे. अशा प्रदेशांतच धरणांची निर्मिती झाली आहे. या धरणांच्या दोन्ही बाजुला वनाच्छादन असल्याने जमिनीची धुप झाली नाही. ही झाडं या परिसरात नसती तर प्रत्येक पावसात धरणांत माती साठून शंभर टीएसमी क्षमता असणारं धरणं गाळाने भरून गेलं असतं. हे वनांनी केलेलं सर्वात महत्वाचं आणि मोठं काम असल्याचं पर्यावरण तज्ज्ञ सांगतात.

राज्यात साताऱ्याची समृध्द ओळख ही येथील धरणं आणि त्यातील पाणी यामुळे आहे. महाराष्ट्रासह कर्नाटकाला पाणी पुरवठा करणारे मोठे कोयना धरण सातारा जिल्ह्यात आहे. याबरोबरीने अन्य छोटी मोठी धरणंही जिल्ह्याचा पिण्याचा, सिंचनाचा आणि विज निर्मितीचा भार उचलत आहेत.

पावसाचं पाणी धरणांपर्यंत जाण्यापूर्वी ते वनक्षेत्रातून जाते. वनक्षेत्रातून गाळून आलेलं पाणी धरणात साठत असल्यामुळे वाहून आलेल्या पाण्यातून मातीचा अंश फारसा आढळत नाही. परिणामी धरणांमध्ये गाळ साठण्याचं प्रमाण कमी असून त्याचं श्रेय धरण परिसरातील वनक्षेत्राला जाते.

जिल्ह्याच्या वनक्षेत्रांत वाघाटी, चिंच, उंबर, बारें, सिताफळ, रामफळ, भोकरं, जांभूळ, करवंद ही फळं तर हेरडा, बेहडा, ऐन, किंजळ, नाना, शेर, अंजनी, डाका, पुमा अशा वनौषधीही येथे मोठ्या प्रमाणात आढळून येते. सदा हरित, शुष्क भागासह निमसदा हरित भागही वनक्षेत्रांमध्ये आढळून येतो. इतकी वैविधतपूर्ण समृध्दता अन्य कुठेही आढळून येत नाही, हे विशेष.

झाड तेच रूप वेगळं!

सातारा जिल्ह्यात पठारावर आणि सपाटीला येणाऱ्या झाडांमध्ये मोठा फरक आढळतो. कास पठारावर असणारी जांभळांची झाडं ही खुजी आहेत तर सपाटीवर येणारी झाडं उंच आहेत. पठारावर असणाऱ्या झाडांना उन आणि पाऊस याबरोबरचं वाऱ्याचा सामना करावा लागत असल्यामुळे त्यांची उंची कमीच राहते. या उलट डोंगराच्या आडून येणाऱ्या वाऱ्याचा फारसा वेग सपाटीच्या झाडांना लागत नसल्यामुळे तिथली झाडं उंच होतात.


आपल्याकडे वनक्षेत्रात मुबलक प्रमाणात वनौषधी आणि वनउपज असलेली फळझाडंही आहेत. वनांमध्ये मुबलक असणाऱ्या या समृध्दीचा उपयोग अद्यापही आपल्याकडे होताना आढळत नाही. यासाठी प्रयत्न होणं आवश्यक आहे.
- सुनिल भोईटे,
पर्यावरण अभ्यासक

Web Title: Water from the dam while preserving forest resources!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.