चित्रे रेखाटून रंगपंचमी साजरी करणार, शाहूपुरी कुंभार गल्लीतील लहान मुलांचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 11:42 AM2021-03-26T11:42:21+5:302021-03-26T11:44:49+5:30

Holi Kolhapur-निसर्गमित्र आणि इंडियन मार्शल आर्ट थांग-ता असोसिएशनतर्फे आयोजित उपक्रमात शाहूपुरी कुंभार गल्लीतील लहान मुलांनी वनस्पतीजन्य रंगनिर्मितीचे धडे गिरविले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरी थांबून चित्रे रेखाटून, रांगोळी काढून रंगपंचमी साजरी करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी केला.

Rangpanchami will be celebrated through the line of pictures, the resolve of the children in Shahupuri Kumbhar street | चित्रे रेखाटून रंगपंचमी साजरी करणार, शाहूपुरी कुंभार गल्लीतील लहान मुलांचा संकल्प

कोल्हापुरात शाहुपुरी कुंभार गल्ली येथील लहान मुलांना निसर्गमित्रचे कार्यवाह अनिल चौगुले यांनी वनस्पतीजन्य रंगनिर्मितीबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. यावेळी शेजारी राणिता चौगुले उपस्थित होत्या. (छाया : नसीर अत्तार)

Next
ठळक मुद्देचित्रे रेखाटून रंगपंचमी साजरी करणार, शाहूपुरी कुंभार गल्लीतील लहान मुलांचा संकल्पनिसर्गमित्र, इंडियन मार्शल आर्ट असोसिएशनचा उपक्रम

कोल्हापूर : निसर्गमित्र आणि इंडियन मार्शल आर्ट थांग-ता असोसिएशनतर्फे आयोजित उपक्रमात शाहूपुरी कुंभार गल्लीतील लहान मुलांनी वनस्पतीजन्य रंगनिर्मितीचे धडे गिरविले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरी थांबून चित्रे रेखाटून, रांगोळी काढून रंगपंचमी साजरी करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी केला.

शाहूपुरीतील महादेव वडणगेकर यांच्या निवासस्थानी वनस्पतीजन्य रंगांची प्रात्यक्षिके आणि मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. त्यात निसर्गमित्रचे कार्यवाह अनिल चौगुले आणि राणिता चौगुले यांनी मार्गदर्शन केले. बेल, पालक, पुदिना, बीट. टोमॅटो, कढीपत्ता, पारिजातक आदी वनस्पतींपासून रंगनिर्मितीची प्रात्यक्षिके त्यांनी करून दाखविली.

विविध ४१ प्रकारच्या वनस्पतींच्या पाने, फुले, फळे, त्यांच्या साली, तर विविध पालेभाज्या, फळभाज्यांच्या टाकाऊ पदार्थांपासून रंगनिर्मितीची माहिती दिली. या वनस्पतीजन्य रंगांचा वापर करून रंगपंचमीदिवशी घरी थांबून चित्रे, रांगोळी रेखाटावी. नैसर्गिक खाद्यरंग वापरून आपल्या आवडीचा पदार्थ तयार करणे, घरात पाण्याचा कितपत वापर होतो, याची माहिती घेणे, आदी उपक्रम राबविण्याचे आवाहन अनिल चौगुले यांनी केले. त्यावर अशा पध्दतीने रंगपंचमी साजरी करण्याचा संकल्प उपस्थित मुले, मुली आणि त्यांच्या पालकांनी केला.

यावेळी अविनाश वडणगेकर, सुनीता कुंभार, शिवाजी कुंभार, आदी उपस्थित होते. इंडियन मार्शल आर्ट थांग-ता असोसिएशनचे सचिव सतीश वडणगेकर यांनी प्रास्ताविक केले. सुनंदा वडणगेकर यांनी आभार मानले.

रंगनिर्मितीची झाडे लावा

पळस, आवळा आदी रंगनिर्मिती करणाऱ्या झाडांच्या बिया संकलित करा. या कार्यशाळेत तुम्हाला दिलेल्या विविध वनस्पतींच्या बिया रूजवून त्यांच्या माध्यमातून पर्यावरणपूरक वनस्पतीजन्य रंगनिर्मितीसाठीची झाडे लावा, असे आवाहन चौगुले यांनी केले. विविध सण, उत्सवावेळी वापरलेल्या फुलांपासून ४५ कुटुंबांनी स्वत:साठी रंगनिर्मिती केली असल्याचे त्यांनी सांगितले.
 

Web Title: Rangpanchami will be celebrated through the line of pictures, the resolve of the children in Shahupuri Kumbhar street

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.