रंगपंचमी विशेष : हजारो निसर्गप्रेमी करतात नैसर्गिक रंगांची उधळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 06:10 PM2021-04-01T18:10:34+5:302021-04-01T18:14:20+5:30

Rangpancmi Kolhapur-कोल्हापूर येथील निसर्गमित्र परिवाराने सातत्याने केलेल्या जनजागृतीमुळे हजारो निसर्गप्रेमींनी वनस्पतींपासून तयार केलेल्या रंगांची उधळण करत पर्यावरणपूरक पध्दतीने रंगपंचमी साजरी केली आहे.

Rangpanchami Special: Thousands of nature lovers spray natural colors | रंगपंचमी विशेष : हजारो निसर्गप्रेमी करतात नैसर्गिक रंगांची उधळण

रंगपंचमी विशेष : हजारो निसर्गप्रेमी करतात नैसर्गिक रंगांची उधळण

Next
ठळक मुद्देनिसर्गमित्रचा प्रयोग यशस्वी : ४१ प्रकारच्या वनस्पतींची लागवड जिल्ह्यातील ४५ कुटुंबे बनवितात रंग

संदीप आडनाईक

कोल्हापूर : येथील निसर्गमित्र परिवाराने सातत्याने केलेल्या जनजागृतीमुळे हजारो निसर्गप्रेमींनी वनस्पतींपासून तयार केलेल्या रंगांची उधळण करत पर्यावरणपूरक पध्दतीने रंगपंचमी साजरी केली आहे.

बेल, पालक, पुदिना, बीट. टोमॅटो, कढीपत्ता, पारिजातक आदी विविध ४१ प्रकारच्या वनस्पतींच्या बिया रुजवून जिल्ह्यातील ४५ कुटुंबांनी वनस्पतीजन्य रंगांची निर्मिती केली आहे. याशिवाय विविध सण, उत्सवावेळी वापरलेल्या फुलांपासूनही या कुटुंबांनी रंगनिर्मिती केली आहे.

गेल्या १५ वर्षांपासून निसर्गमित्र परिवार या संस्थेमार्फत प्रामुख्याने कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये ग्रामीण आणि शहरी भागात पर्यावरणविषयक जनजागृतीसाठी काम केले जाते. दरवर्षी रंगपंचमीही पर्यावरणपूरक पद्धतीने उत्साहात साजरी व्हावी, यासाठी संस्थेमार्फत सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.

संस्थेचे कार्यवाह अनिल चौगुले आणि त्यांच्या पत्नी राणिता चौगुले दरवर्षी रंगनिर्मितीच्या कार्यशाळा घेतात. त्याला चांगला प्रतिसाद मिळतो. या रंगांचा वापर करून कोल्हापूरसह पुणे, मुंबई, गोवा, नाशिक, अहमदनगर, नांदेड, अमरावती जिल्ह्यांमधील निसर्गप्रेमी रंगपंचमी साजरी करतात.
संस्थेतर्फे सात वर्षांपूर्वी रंग देणाऱ्या वनस्पतींची रोपे तयार करून त्यांचे वाटप करण्यात आले होते. यंदा यामध्ये बहावा, बेल, आवळा, कढीपत्ता, शेंद्री, पारिजातक, पळस, जांभूळ, शेवगा, भोकर, कडुलिंब, गोकर्ण, बकुळ, कुंकूफळ, टाकाळा, कोकम, जास्वंद, झेंडू आदी वनस्पतींची रोपे देण्यात आलेली होती.

रंगपंचमीसाठी रंगांचा मोठा वापर

या अनेक वनस्पतींपासून तयार केलेले रंग मोठ्या प्रमाणात रंगपंचमीसाठी वापरण्यात येतात. याशिवाय चित्र रंगवणे, रांगोळीमध्ये रंग भरणे, खाद्यरंग, सरबत, मिठाई, आईस्क्रिम, केक तयार करणे, गणपतीच्या मूर्तीसाठी या रंगांचा वापर करणे, लग्नसमारंभातील अक्षता रंगवण्याकरिता, हळद खेळण्याकरिता, कपडे डाय करण्यासाठी अशा विविध कारणांसाठी रंग वापरण्यात येतो.

४५ कुटुंबांनी तयार केली रंगनिर्मिती

पळस, आवळा आदी रंगनिर्मिती करणाऱ्या विविध वनस्पतींच्या बिया रुजवून पर्यावरणपूरक वनस्पतीजन्य रंगनिर्मितीसाठीच्या झाडांपासून तसेच विविध सण, उत्सवावेळी वापरलेल्या फुलांपासून ४५ कुटुंबांनी रंगनिर्मिती केली आहे. बेल, पालक, पुदिना, बीट. टोमॅटो, कढीपत्ता, पारिजातक आदी विविध ४१ प्रकारच्या वनस्पतींची पाने, फुले, फळे, त्यांच्या साली, तसेच विविध पालेभाज्या, फळभाज्यांच्या टाकाऊ पदार्थांपासून रंगनिर्मिती करण्यात आली आहे.
 

Web Title: Rangpanchami Special: Thousands of nature lovers spray natural colors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.