पन्हाळ्याचे दुर्लक्षित अश्नीस्तंभ आता जागतीक वारसास्थाळात नोंद होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 05:25 PM2020-12-17T17:25:24+5:302020-12-17T17:27:00+5:30

पन्हाळ्याच्या पायथ्याशी दुर्लक्षित आसणारे अश्नीस्तंभ आता जागतिक वारसास्थाळात नोंद होत असलेने पन्हाळ्याचे नांव आणखीनच उंचावले आहे

The neglected stone pillar of the Panhala will now be inscribed on the World Heritage List | पन्हाळ्याचे दुर्लक्षित अश्नीस्तंभ आता जागतीक वारसास्थाळात नोंद होणार

पन्हाळ्याचे दुर्लक्षित अश्नीस्तंभ आता जागतीक वारसास्थाळात नोंद होणार

googlenewsNext
ठळक मुद्देदुर्लक्षित अश्नीस्तंभ आता जागतीक वारसास्थाळात नोंद होणारपन्हाळ्याचे नांव आणखीनच उंचावणार

नितीन भगवान

पन्हाळा - पन्हाळ्याच्या पायथ्याशी दुर्लक्षित आसणारे अश्नीस्तंभ आता जागतिक वारसास्थाळात नोंद होत असलेने पन्हाळ्याचे नांव आणखीनच उंचावले आहे

पन्हाळा वनविभागाने विशेष प्रस्ताव दाखल करुन हे अश्नीस्तंभ जागतिक वारसास्थाळात नोंद करण्याच्या प्रक्रीयेने वेग घेतल्याची माहीती परिक्षेत्र वनअधिकारी प्रीयांका दळवी यांनी दिली यासाठी कोल्हापुर मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन यांचे व भुर्गभ शास्त्रज्ञ प्रा.पिष्टे यांचे सहकार्याने हे शक्य झाले असलेचे त्यांनी अवर्जुन सांगीतले

साधारण सत्तर लाख वर्षांपूर्वी पन्हाळा आणि मसाई पठाराची डोंगरमाला अस्तित्वात आली तेव्हा अश्नीस्तंभ ही रचना बनली, गरम असलेला शिलारस बेसॉल्ट प्रकारच्या काळ्या दगडात परावर्तित होऊन या रचनेचा हा समूह तयार झाला आहे. हवामान आणि भूगर्भीय हालचालीमुळे यातील माती आणि इतर गोष्टी यांची धूप होऊन हे अद्भुत नैसर्गिक आश्चर्यकारक दगड उघड्यावर आले.

अश्नीस्तंभ पाहण्यासाठी पन्हाळा ते बांदिवडे हे अंतर ७ किलोमीटर आहे आणि कोल्हापुर वरून बांदिवडे २५ किलोमीटर अंतर आहे. बांदिवडेच्या अलीकडे उजव्या बाजूला हे अश्नीस्तंभ दिसून येतात.

अगदी कोरून एकमेकांवर ठेवल्याप्रमाणे हे भल्या मोठ्या दगडांचे उंचच उंच असे नैसर्गिक दगडी खांब तयार झाले आहेत. दहा ते बारा किंवा जास्ती दगड एका एका खांबात भक्कमपणे उभे आहेत. यातील एका खांबात तर मधला दगड फुटून खांबातच सुंदर अशी खिडकी बनली आहे.

अश्नीस्तंभाची उंची १५ फुटापासून साधारणतः २५ फुटापर्यंत आहे. अशीच आणखी एक शृंखला पन्हाळा ते मसाई पठार या दरम्यान आहे, पण ती एकदम लहान आहे. एका रांगेतील दोन पठारांना जोडणाऱ्या चिंचोळ्या भागात अशी रचना दिसून येते.

आयर्लंडमध्ये डेविल्स रॉक्स, कर्नाटक मध्ये मेरी आर्यलंड आणि पन्हाळ्याजवळील ही अश्नीस्तंभ अश्या तीनच रचना पूर्ण जगात आहेत. पन्हाळ्याव्यतीरीक्त या रचना समुद्रकिनारी आहेत, त्यांचे दिसणे वेगळे आहे. पण पन्हाळ्याजवळील रचना पूर्णपणे भिन्न दिसते. इथे नैसर्गिक गुहापण आहेत.

ज्वालामुखी,शिलारस, बेसॉल्ट यांचा सखोल अभ्यास या ठिकाणी केला जाऊ शकतो. सह्याद्रीच्या रांगेतील ही भौगोलिक वैशिष्ट्ये नक्कीच पाहिली पाहिजेत, जपली पाहीजेत.  पन्हाळा वनविभागने या ठिकाणी चढाई करण्यास, गुरे चारण्यास मनाई केली आहे. आता याठिकाणी हे अश्नीस्तंभ पहाण्यासाठी विशेष योजना करण्यात येइल.
-प्रियांका दळवी,  
परिक्षेत्र वनअधिकारी, पन्हाळा.

Web Title: The neglected stone pillar of the Panhala will now be inscribed on the World Heritage List

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.