'पाण्यासाठी प्लास्टिकची, पेटची बाटली नकोच' म्हणणाऱ्यांसाठी...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2019 12:34 PM2019-12-28T12:34:27+5:302019-12-28T13:08:14+5:30

काचेच्या बाटल्या पर्यावरणासाठी प्लास्टिकपेक्षा जास्त धोकादायक असल्याचा इशारा २०१९ च्या सुरुवातीला कोका कोलानं दिला.

Myths about pet or plastic bottles | 'पाण्यासाठी प्लास्टिकची, पेटची बाटली नकोच' म्हणणाऱ्यांसाठी...

'पाण्यासाठी प्लास्टिकची, पेटची बाटली नकोच' म्हणणाऱ्यांसाठी...

googlenewsNext

प्लास्टिकबद्दलची माहिती वाचल्यावर आपल्याला ते शाप वाटू लागतं. पर्यावरण संरक्षणाचा विचार करणाऱ्या आपल्यातल्या अनेकांना काच हा उत्तम पर्याय वाटतो. यासाठी आपण सिंगल यूज प्लास्टिकबद्दल संयुक्त राष्ट्रानं दिलेल्या अहवालाचा संदर्भदेखील देतो. मात्र त्या अहवालातील माहिती वाचून, आंधळेपणानं पावलं उचलून समस्या सुटणार नाही, याचा आपल्याला विसर पडतो. त्यामुळे चांगला पर्याय शोधण्यासाठी आपण उत्पादन, वजन, पुनर्वापर, विल्हेवाट यासह इतर गोष्टींचा विचार करायला हवा. 

काचेच्या बाटल्या पर्यावरणासाठी प्लास्टिकपेक्षा जास्त धोकादायक असल्याचा इशारा २०१९ च्या सुरुवातीला कोका कोलानं दिला. यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. याबद्दल एक रंजक माहिती उपलब्ध आहे. जर्मनी, स्वीडन, डेन्मार्क आणि नॉर्वेनं २० वर्षांपूर्वी काचेच्या बाटल्या रिफिलिंग करण्याची यंत्रणा सुरू केली होती. सुरुवातीला हे पाऊल यशस्वीदेखील ठरलं. मात्र यानंतर त्या देशांमध्ये रिफिलिंग करण्यात आलेल्या बाटल्यांचा वापर कमी होऊ लागला. 

निर्मितीचा खर्च, वजन, टिकाऊपणा या बाबतीत काचेच्या बाटल्यांच्या तुलनेत प्लास्टिकच्या बाटल्यांच्या तुलनेत उजव्या ठरल्या. या तांत्रिक मुद्द्यांसोबतच प्लास्टिक आणि काचेची तुलना करताना आरोग्याचादेखील विचार करायला हवा. काचेच्या बाटल्या आरोग्याच्या दृष्टीनं चांगल्या असल्याचं मानलं जातं. तशी अनेकांची समजूत आहे. मात्र काचेच्या बाटल्यांचा शरीरावर अतिशय प्रतिकूल परिणाम होतो. वारंवार वापरता येणाऱ्या बाटल्यादेखील आरोग्याच्या दृष्टीनं धोकादायक असतात.  वारंवार वापरता येणाऱ्या बाटल्यांचं झाकण ओलसर असतं. त्यामुळे तिथे सूक्ष्मजंतूंची वाढ मोठ्या प्रमाणात होते. काचेतील पदार्थांमुळे पाणी काचेला चिकटून राहातं. त्यामुळे सूक्ष्मजंतूंची वाढ अतिशय झपाट्यानं होत जाते आणि सूक्ष्मजंतूंची बायोफिल्म तयार होते. 

सूक्ष्मजंतू मोठ्या प्रमाणात पृष्ठभागाला चिकटून राहतात. सुरुवातीला सूक्ष्मजंतू बहुपेशीय जीव म्हणून काम करतात. यानंतर सूक्ष्मजीव पर्यावरणामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा घेऊन आणि उपलब्ध पोषक घटकांचा वापर करुन वेगानं वाढतात. बाटल्या हाताळताना त्या दूषित होतात. त्यामुळे सूक्ष्मजंतूंची वाढ होते आणि अप्रत्यक्ष संपर्कातून त्यांचा प्रवास होतो. वारंवार वापरता येणाऱ्या बाटल्या अनेकांकडून हाताळल्या जातात. त्यामुळे दूषित होण्याचा धोका जास्त असतो. बाटल्यांच्या आतील बाजूस सूक्ष्मजंतू चिकटल्यानं त्यांच्याकडून बाटलीतील पाणी दूषित होण्याचा धोका असतो. सूक्ष्मजंतूंच्या माध्यमातून तयार झालेली बायोफिल्म नष्ट करण्यासाठी औद्योगिक क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या पद्धतींचाच वापर करावा लागतो. 

प्लास्टिक वेगवेगळं करण्याची आणि ते पुनर्प्रक्रियेसाठी पाठवण्याची शपथ तुम्ही घेता का?

हो (113 votes)
नाही (19 votes)

Total Votes: 132

VOTEBack to voteView Results

बायोफिल्म्स असलेल्या बाटल्यांमधून पाणी प्यायल्यास विविध प्रकारचे संसर्ग होण्याची शक्यता असते. मूत्रमार्गातील संसर्ग, कानाच्या आतील भागात होणारे संसर्ग यासारखे विविध प्रकारचे संसर्ग यामुळे होऊ शकतात. याशिवाय दातावर पिवळा थर साचणं, उलट्या, अतिसार यांच्यासारखे जठर आणि आतड्यांचे आजार होण्याचादेखील धोका संभवतो. विकसनशील देशांमध्ये शुद्ध पाण्याची समस्या असते. त्यामुळे अशा देशांमध्ये बायोफिल्ममुळे होणारा धोका अतिशय जास्त असतो. त्यामुळे वारंवार वापरता येणाऱ्या बाटल्या पाणी पिण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित नसतात. 

अ‍ॅल्युमिनियमच्या बाटल्या तुलनेनं जास्त सुरक्षित असल्याचं मानलं जातं. मात्र वास्तव तसं नाही. अ‍ॅल्युमिनियममध्ये हानीकारक रसायनं आणि संयुगं असतात. अ‍ॅल्युमिनियमच्या बाटल्यांना असलेल्या हार्ड प्लास्टिकच्या झाकणांमध्ये बीपीएचं प्रमाण जास्त असू शकतं. यामुळे आनुवंशिक आजारांसह इतर शारीरिक व्याधी होण्याचा धोका असतो. अ‍ॅल्युमिनियममुळे न्यूरोटॉक्सिसिटी होण्याचीदेखील भीती असते. यामुळे पेट (PET) उपयुक्त ठरतात.

प्लास्टिक हायड्रोफोबिक असल्यानं पाणी त्याला चिकटत नाही. त्यामुळे सूक्ष्मजंतू तयार होण्याचा आणि ते पृष्ठभागाला चिकटून राहण्याची शक्यतादेखील कमी होते.  पेटपासून तयार करण्यात आलेल्या बाटल्या एकदाच वापरल्या जात असल्यानं त्या इतरांच्या संपर्कात येत नाहीत. यामुळे दूषित होण्याचा धोका टाळता येतो. पेट सुरक्षित आणि किफायतशीर पर्याय असल्यानं जगभरात त्याची लोकप्रियता वाढली आहे.  प्लास्टिक चांगला पर्याय असू शकतो, हे आकडेवारीवरुन दिसतं. त्याचा पुनर्वापर शक्य असल्यानं तो निव्वळ चांगला पर्याय नाही, तर सर्वोत्तम पर्याय ठरतो. 

बाटल्यांची निर्मिती करताना आता पॉलियेथलिन टेरेफथलेटचा (PET किंवा PETE) वापर केला जातो. हा थर्मोप्लास्टिक पॉलिमरचा प्रकार असून तो पॉलिस्टर श्रेणीतील एक पदार्थ आहे. अतिशय मजबूत, हलकं आणि टिकाऊ असल्यानं बाटल्यांच्या उत्पादनासाठी ते सुयोग्य ठरतं. 

पेटचं मूल्यांकन करण्यासाठी त्याची विविध मापदंडांवर अ‍ॅल्युमिनियम आणि काचेसोबत तुलना करायला हवी. 

उगम

पेटची निर्मिती नॉन रिन्यूएबल पेट्रोलियमपासून केली जाते. इतर रिन्यूएबल पेट्रोलियम पदार्थांच्या तुलनेत पेटच्या निर्मितीत कमी ऊर्जा लागते. पुनर्वापर करण्यात आलेलं प्लास्टिक आणि पुनर्वापर न केलेले पदार्थ वापरुन तयार करण्यात आलेल्या प्लास्टिकचा (व्हर्जिन प्लास्टिक) वापर केल्यास पेटच्या निर्मितीवेळी होणारं कार्बन उत्सर्जनदेखील कमी करता येतं. 

काचेची निर्मिती करताना वाळू, सिलिका आणि चुनखडीसारख्या नॉन रिन्यूएबल संसाधनांचा वापर होतो. या पदार्थांना तापवण्यासाठी १२०० अंश सेल्सिअस तापमान लागतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ऊर्जा खर्च होते. 

अ‍ॅल्युमिनियमची निर्मिती बॉक्साईटपासून होते. खाणीतून बॉक्साईट काढताना संवेदनशील परिसंस्थेला धोका निर्माण होतो. याशिवाय अ‍ॅल्युमिनियमच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर पाणी आणि उर्जा लागते. त्यामुळे प्रदूषणदेखील खूप होतं.  याशिवाय आणखी काही रंजक माहितीदेखील उपलब्ध आहे. पर्यावरणाला अ‍ॅल्युमिनियम कॅन्सपेक्षा जास्त धोका विल्हेवाट लावता येण्याजोग्या काचेच्या बाटल्यांमुळे आहे. यामुळे वातावरणात होणारे बदल २३ टक्क्यांनी वाढू शकतात. याशिवाय जीवाश्व संसाधनांचा वापर ४३ टक्क्यांनी वाढू शकतो. या तिन्ही पर्यायांची तुलना केल्यास प्लास्टिक बाटल्यांचा जागतिक तापमान वाढीवर होणारा परिणाम अतिशय कमी असल्याचं दिसून येतं. 

वजन

वजन महत्त्वाचं का ठरतं? याचं कारण अतिशय सोपं आहे. वजनाचा थेट संबंध वाहतूक आणि इंधनाच्या वापराशी आहे. यासाठी ही आकडेवारी विचारात घ्या- ३३५ मिलीलीटरच्या अ‍ॅल्युमिनियम कंटेनरचं वजन ११ ग्रॅम असतं. तर पेट बॉटलचं वजन २४ ग्रॅम आणि काचेच्या बाटलीचं वजन २०० ग्रॅम इतकं असतं. त्यामुळे ट्रकमधून काचेच्या बाटल्यांची वाहतूक करायची असल्यास वजन जास्त असल्यानं ट्रकला अधिक फेऱ्या माराव्या लागतील. ट्रकमधून जास्त भार वाहून न्यायचा असल्यानं त्यासाठी इंधनदेखील जास्त लागतं. त्याउलट पाण्यानं किंवा शीतपेयानं भरलेल्या प्लास्टिक बाटल्या वाहून नेण्यासाठी ४० टक्के कमी इंधन लागतं. 

पुनर्वापर

पेटवर अतिशय सोप्या पद्धतीनं पुनर्वापराची प्रक्रिया करता येते. या प्रकियेदरम्यान नैसर्गिक संसाधनांना धोका पोहोचत नाही. यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होत असल्यानं वातावरणातील बदल रोखण्यासही मदत होते. पेटच्या पुनर्वापराची प्रक्रिया पर्यावरणस्नेही आहे. 
काचेच्या पुनर्वापरासाठी प्रक्रिया करता येते. मात्र यामध्ये काही निर्बंध येतात. सर्व प्रकारच्या काचांवर प्रक्रिया करता येत नाही. काही काचांमध्ये अशुद्ध घटक असल्यानं त्याचा परिणाम संपूर्ण  पुनर्वापर प्रक्रियेवर होऊ शकतो. याशिवाय या प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात कामगार लागतात. त्यामुळे ही प्रक्रिया खर्चिक होते.

अ‍ॅल्युमिनियमवर सतत प्रक्रिया केल्यास त्याच्या दर्जावर परिणाम होतो. त्यात अनेक अशुद्ध घटक निर्माण होत असल्यानं संपूर्ण प्रक्रियाच निरर्थक ठरते. अ‍ॅल्युमिनियमवर पुनर्वापर प्रक्रिया करताना अनेक विषारी रसायनं निर्माण होतात. ती हवेत सोडली जातात. या प्रक्रियेतून ड्रॉस (वितळलेल्या धातूंचा गाळ) नावाचा अतिशय विषारी कचरा तयार होतो. तो जमिनीत पुरला जातो. याशिवाय अ‍ॅल्युमिनियमच्या पुनर्वापरासाठी करावी लागणारी प्रक्रियादेखील अतिशय गुंतागुंतीची आहे. त्यात इतर निरुपयोगी पदार्थांमधून अ‍ॅल्युमिनियम वेगळं करावं लागतं. त्यामुळे प्रक्रिया वेळखाऊ आणि खर्चिक होते. 

आकडेवारीवर नजर टाकल्यास पुनर्वापराच्या बाबतीत भारत पहिल्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियात २४ टक्के पेट बॉटल्सवर प्रक्रिया केली जाते. पण भारतात हेच प्रमाण ९३ टक्के इतकं आहे. त्यामुळे निष्कर्ष अतिशय सुस्पष्ट आहे. प्लास्टिक वाईट नाही. पेट बाटल्यांवर पुनर्वापर प्रक्रिया केल्यास त्या पर्यावरणासाठी चांगल्या आहेत. पेटला दोष देण्यापेक्षा आपण आपल्या वर्तनात बदल करुन पुनर्वापर प्रक्रियेवर अधिकाधिक भर द्यायला हवा.

Web Title: Myths about pet or plastic bottles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.