World Environment Day: वन्यप्राण्यांशिवाय मानव जगणे अशक्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 12:59 AM2020-06-05T00:59:32+5:302020-06-05T01:00:03+5:30

हिंदू धर्मासकट सर्व प्राण्यांवर दया करण्याचा मंत्र देणारे बुद्ध व महावीरदेखील आपल्या देशातीलच. मात्र, त्यांची शिकवण आपण प्रत्यक्ष आचरणात आणतो का..? तर नाही, या संवर्धन तत्त्वाकडे दुर्लक्ष करतोय. वन्यजीवन हे मानवी जीवनाइतकेच पुरातन आहे.

It is impossible for humans to survive without wildlife! | World Environment Day: वन्यप्राण्यांशिवाय मानव जगणे अशक्य!

World Environment Day: वन्यप्राण्यांशिवाय मानव जगणे अशक्य!

Next

यादव तरटे पाटील
वन्यजीव अभ्यासक, अमरावती
 संपर्क- ९७३०९००५००
www.yadavtartepatil.com

केरळमधील हत्तीची चित्रफीत जगभर व्हायरल झाली. वाघ व इतर वन्यप्राण्यांना देवस्थानी मानूनही केरळमधील घटना ही संवेदनाहीनतेचा कळसच ठरली. घर व शेतीतील कोळी, पाली, उंदीर मारूनही जैवविविधतेला हानी पोहोचवली जात आहे. वेदांपासून सुरू झालेला भारताचा प्रवास संवर्धनाच्या दिशेने जाणारा असला तरी त्याला आता खीळ बसली आहे. वेदातील एकतृतीयांश सूत्रांत पशुसंरक्षणाच्याच महतीचे वर्णन केलेय.

हिंदू धर्मासकट सर्व प्राण्यांवर दया करण्याचा मंत्र देणारे बुद्ध व महावीरदेखील आपल्या देशातीलच. मात्र, त्यांची शिकवण आपण प्रत्यक्ष आचरणात आणतो का..? तर नाही, या संवर्धन तत्त्वाकडे दुर्लक्ष करतोय. वन्यजीवन हे मानवी जीवनाइतकेच पुरातन आहे. मात्र, आपला निसर्गाशी संबंध पूर्वीसारखा जवळचा राहिलेला नाही. म्हणून काही लोक वनाचे व वन्य प्राण्यांचे संरक्षण का व कशासाठी करावयाचे, असा थेट सवाल करतात. याला पराकोटीचे अज्ञान म्हणायचे, की माणसाची आत्मकेंद्री प्रवृत्ती, की शिक्षण व संस्कार व्यवस्थेचे अपयश! याचाही या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विचार होणे आवश्यक आहे.


गेल्या दोन हजार वर्षांत सस्तन प्राण्यांच्या तब्बल ७७ जाती जगातून नामशेष झाल्यात. इतकेच काय तर यातील ३९ सस्तन प्रजाती केवळ विसाव्या शतकात नामशेष झाल्यात. पक्ष्यांसह इतर जिवांच्या हजारो प्रजाती नामशेष झाल्यात. अजूनही शेकडो नामशेष होत आहेत. जंगल प्राणवायू देते, जंगलातून नद्यांमध्ये जल वाहते, विहिरी जलमय होतात. यातून तहान भागते, शेतीला पाणी देऊन अन्न उगवतो. प्राणवायू, पाणी आणि अन्न देणाºया माणसाच्या डोक्यात शिकार करण्याचे धाडस का बरे होत असावे? वन्यप्राण्यांची हत्या करून काय मिळत असावे? शासकीय व्यवस्थेमुळे लोकांना खायला गहू, तांदूळ तर उपलब्ध आहेच, मग असे असूनही शिकार का केली जात असावी? अर्थात, याला दुसरी बाजूदेखील आहे.


पूर्वीच्या काळात जंगले घनदाट होती. त्यामुळेच वन्य प्राण्यांचे संरक्षण उत्तम होत असे; परंतु विसाव्या शतकाच्या सुरुवातीस वन्यप्राण्यांची निर्दयपणे कत्तल करण्यास सुरुवात झाली. भयावह लोकसंख्या वाढ, त्यामुळे बदललेली आर्थिक परिस्थिती, जमिनीसंबंधीची वाढती गरज, निरनिराळ्या प्रकल्पांसाठी झालेली जंगलतोड, वाहतूक व दळणवळण, अतिक्रमण, बंदुकांचा शोध व शिकार आणि यातून मिळणाºया आर्थिक फायद्यामुळे आलेला व्यापार यामुळे वन्यप्राण्यांची संख्या कमी झाली. कोरोना व्हायरसमुळे दक्षिण आफ्रिकेत जारी केलेला लॉकडाऊन तेथील जंगलांमध्ये नांदणाºया गेंड्यांच्या मुळावर उठलाय. सुमारे डझनभर गेंड्यांची शिकार झाली. भारतातही अशा अनेक घटना घडल्या. महाराष्ट्रात शिकारीची अनेक प्रकरणे पुढे आलीत. तब्बल ८० दिवसांहून अधिक दिवस कायम राहिलेल्या लॉकडाऊनमुळे माणसांचा वावर कमी झाला. हरिण, अस्वल व बिबळ्यांसह अनेक वन्यप्राणी मनुष्यवस्त्यांजवळ व प्रसंगी आत आल्याच्या चित्रफिती समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यात. माणसाची सवय बदलायला साधारणत: २१ दिवस लागतात, तर वन्यप्राण्यांची सवय बदलायला ३० दिवस लागतात. तब्बल ८० हून अधिक दिवस चालणाºया या लॉकडाऊनमुळे वन्यप्राण्यांना मुक्त संचार करायची सवय लागली आहे. गाव व शहरी वस्त्या तसेच रस्ते व महामार्गावर त्यांचा सहज वावर दिसतोय, तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे रोजगार व भविष्याची चिंता लागली आहे. हाताला काम नाही. जगण्याच्या अडचणी व करमणूक नसल्यामुळे शिकारीचे प्रमाण आधीच वाढले असताना लॉकडाऊन संपल्यानंतरचे चित्र अधिक वाईट असण्याची भीती आहे.


वन्यप्राण्यांचा मुक्त संचार, त्यांच्या बदललेल्या सवयी आणि लॉकडाऊन उघडल्यानंतर माणसांच्या वाढता वावर यातून मोठ्या प्रमाणात मानव व वन्यजीव संघर्ष निर्माण होईल, तसेच रस्ते अपघातात मृत्यूचे प्रमाण वाढेल. शिकार तसेच मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधनसामग्रीवर ताण वाढेल. आपण आपल्या विकासाच्या योजना आखताना निसर्गाशी संबंधित गोष्टींचा विचार करीत नाही. वन्यप्राण्यांना निसर्गाने विशिष्ट कामगिरी दिलेली आहे. आपल्याला वाटते त्यापेक्षा कितीतरी अधिक पटींनी वन्यप्राण्यांचा मानवाला उपयोग होतो. वाघ, बिबळ्या व इतर वन्यप्राणी जंगल जगवतात. पक्षी, साप व कोळी कीड नियंत्रण करून शेतकºयांची शेती जपतात. मधमाशी व कीटक परागीभवन करतात. गांडूळ व इतर जीव जमीन भुसभुशीत करून सुपीक करतात. इतकेच काय तर वन्यप्राणी व कोळ्यांच्या विष्ठेमुळे मृदा सुपीक होते. अजूनही याची व्याप्ती अधिक आहे. जंगलांचा ºहास व वन्यप्राण्यांची संख्या कमी झाल्याने निसर्गात जो असमतोल निर्माण होईल त्याचे परिणाम सरळ आपल्या अस्तित्वावर घाला घालणारे असतील यात तीळमात्र शंका नाही.

 

Web Title: It is impossible for humans to survive without wildlife!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.