सांगलीत कमळ पक्षाच्या आगमनाने पक्षीप्रेमी आनंदले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:06 PM2021-05-25T16:06:31+5:302021-05-25T16:10:25+5:30

environment birds sanctuary : शहरी रहिवासापासून दुरावलेला कमळ पक्षी सांगलीत मंगळवारी अचानक दिसला. शामरावनगरमधील दलदलीत किडे टिपताना पक्षीप्रेमींना त्याचे दर्शन झाले. सुमारे दहा वर्षांनंतर तो सांगलीत आढळल्याची माहिती पक्षी अभ्यासक ॲड. फिरोज तांबोळी यांनी दिली.

Bird watchers rejoiced at the arrival of the Lotus Party in Sangli | सांगलीत कमळ पक्षाच्या आगमनाने पक्षीप्रेमी आनंदले

सांगलीत कमळ पक्षाच्या आगमनाने पक्षीप्रेमी आनंदले

googlenewsNext
ठळक मुद्देसांगलीत कमळ पक्षाच्या आगमनाने पक्षीप्रेमी आनंदलेसुमारे दहा वर्षांनंतर सांगलीत आढळला कमळ पक्षी

सांगली : शहरी रहिवासापासून दुरावलेला कमळ पक्षी सांगलीत मंगळवारी अचानक दिसला. शामरावनगरमधील दलदलीत किडे टिपताना पक्षीप्रेमींना त्याचे दर्शन झाले. सुमारे दहा वर्षांनंतर तो सांगलीत आढळल्याची माहिती पक्षी अभ्यासक ॲड. फिरोज तांबोळी यांनी दिली.

दलदलीची ठिकाणी कमी झाल्याने हा पक्षी शहरापासून दुरावला आहे. कृष्णेच्या काठावर कधीकधी दिसायचा, पण गेल्या दहा वर्षांत तो अचानक गायब झाला. गेल्या दोन वर्षांत शामरावनगरमध्ये पुराचे पाणी शिरुन बरीच दलदल निर्माण झाली आहे.

देशी व स्थलांतरीत विदेशी पक्ष्यांसाठी ही दलदल म्हणजे अन्न मिळविण्यासाठी हक्काची जागा ठरली आहे. ॲड. तांबोळी सहकाऱ्यांसमवेत तेथे पक्षी निरिक्षण करत असताना कमळ पक्ष्यांचा थवा दिसला. आठ ते दहा पक्षी गेल्या काही दिवसांपासून तेथे येत असावेत असे तांबोळी म्हणाले. लांब शेपटीचा कमळ पक्षी अत्यंत देखणा व सभ्य पक्षी मानला जातो.

Web Title: Bird watchers rejoiced at the arrival of the Lotus Party in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.