नगरमध्ये रोज ६० एमएलडी सांडपाणी सीना नदीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 12:06 PM2019-12-19T12:06:35+5:302019-12-19T12:08:10+5:30

परिसरातील शेतीचे आरोग्य धोक्यात

Ahamdnagars 60 MLD wastewater daily in the river Sina | नगरमध्ये रोज ६० एमएलडी सांडपाणी सीना नदीत

नगरमध्ये रोज ६० एमएलडी सांडपाणी सीना नदीत

googlenewsNext

- अण्णा नवथर

अहमदनगर : शहराची लोकसंख्या साडेचार लाख असून, शहराला दररोज ७२ एमएलडी पाणी लागते़  यातील सुमारे ६० एमएलडी सांडपाणी जवळच असलेल्या सीना नदीत सोडण्यात येते़  या पाण्याचा पिण्यासाठी वापर होत नसला तरी शेतीसाठी मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे शेतीचे आरोग्य धोक्यात आले आहे. 

शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी १९९० मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने १०.५० एमएलडीचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला. मात्र, अवघ्या सात वर्षांत या प्रकल्पाला घरघर लागली़  तेव्हापासून शहरातील सांडपाणी सीना नदीपात्रात सोडण्यात येते़  नव्याने उभ्या राहिलेल्या सावेडी, बोल्हेगाव, केडगाव, सारसनगर, बुरूडगाव आदी उपनगरांतील वसाहतींमध्ये सांडपाणी साठविण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे; परंतु मध्यवर्ती शहरातील सांडपाणी आजही या नदीपात्रातच सोडले जाते़  या भागातील नेमके किती सांडपाणी नदीत सोडले जाते, याची आकडेवारी महापालिका प्रशासनाकडे उपलब्ध नसली तरी सुमारे ८० टक्के पाणी नदीत सोडले जात असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे़. याचा अर्थ सुमारे ६० एमएलडी पाणी दररोज नदीपात्रात सोडण्यात येते़.

शहरातील सांडपाणी नदीत न सोडता त्यावर प्रक्रिया करण्यासाठी नव्याने प्रकल्प हाती घेण्यात आला आहे़ शासनाच्या अमृत योजनेंतर्गत जलशुद्धीकरण प्रकल्पासह भुयारी गटारीचे काम सुरू आहे़  सुमारे १२४ कोटी रुपये खर्चून पहिल्या टप्प्यात मध्यवर्ती शहरातील पाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे़  हा प्रकल्प ५७ एमएलडी क्षमतेचा असून, जलशुद्धीकरण प्रकल्पाचे ४० टक्के काम पूर्ण झाले आहे़  येत्या वर्षभरात हा प्रकल्प कार्यान्वित होईल़  प्रक्रिया केलेले पाणी वाकोडी भागातील शेतकऱ्यांना दिले जाईल़  त्यामुळे सीना नदी प्रदूषित होणार नाही, असे महापालिका प्रशासनाकडून सांगितले जात आहे. 

सांडपाण्यावर प्रक्रिया हाच पर्याय
अ‍ॅसिडयुक्त पाण्यात ऑक्सिजन नसतो़  त्यामुळे जलचर प्राणी जगूच शकत नाहीत. हे पाणी झिरपून विहिरीत जाते़  हे पाणी पिण्यासाठी घातक असते़  या पाण्याचे सिंचन केल्यास पिके तरारून येतात; पण ही पिके आरोग्यासाठी घातक असतात़  त्यामुळे सांडपाण्यावर प्रक्रिया हाच एकमेव उपाय आहे़  प्रक्रिया केलेले पाणी फळे, भाजीपाला, धान्य आदी पिकांना वापरू नये़  प्रक्रिया केलेले पाणी खाद्य पिकांसाठी न वापरता अखाद्य पिकांना वापरावे़, अशी माहिती पर्यावरणतज्ज्ञ बी़ एऩ शिंदे यांनी दिली. 

1990 मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने १०़ ५० एमएलडीचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला. मात्र, अवघ्या सात वर्षांत या प्रकल्पाला घरघर लागली़  तेव्हापासून शहरातील सांडपाणी सीना नदीपात्रात सोडण्यात येते़  

350 हेक्टर क्षेत्र या नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. या क्षेत्रावर ऊस, मका यासारखी पिके घेतली जातात, तसेच या भागात फुलकोबी, कोथिंबीर यासारखा भाजीपाला पिकविला जातो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याची माहिती या गावकऱ्यांनी दिली. 

4.5 लाख अहमदनगर शहराची लोकसंख्या 
72 एमएलडी पाणी शहराला दररोज लागते 
60 एमएलडी पाणी नदीत रोज सोडण्यात येते
350 हेक्टर क्षेत्र अवलंबून सीना नदीच्या पाण्याचा पिण्यासाठी वापर होत नाही; पण सीना नदीतीरावर नागापूर, बोलेगाव, बुरुडगाव, पारगाव ही गावे आहेत.

Web Title: Ahamdnagars 60 MLD wastewater daily in the river Sina

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.