... when Karan Johar asked for Salman | ...जेव्हा करण जोहरने सलमानकडे भीक मागितली
...जेव्हा करण जोहरने सलमानकडे भीक मागितली

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ६ - करण जोहरचा 'ए दिल हैं मुश्किल' चित्रपट मनसेच्या धमकीमुळे अडचणीत सापडताच सलमान खान करणच्या मदतीला धावून गेला. सलमान आणि करणमधला मैत्रीचा धागा आज घट्ट असला तरी,  पहिल्या चित्रपटाच्यावेळी अशी स्थिती नव्हती. करणने नुकत्याच एका चॅट शो मध्ये 'कुछ कुछ होता है' या त्याच्या पहिल्या चित्रपटाच्या  आठवणी सांगितल्या. 
 
चित्रपटात सलमान आणि काजोलवर एक गाणे चित्रीत होणार होते. या गाण्यामध्ये सलमानला काळया रंगाचा सूट परिधान करायचा होता. पण सलमान सूट घालायला तयार नव्हता. त्याला एक फाटकी जीन्स आणि सफेद टी-शर्ट घालायचे होते. 
 
साखरपुडयाच्या सीनमध्ये सलमानने निवडलेला पोषाख फीट बसणारा नव्हता. सुरुवातीला मला वाटले तो माझी मस्करी करतोय. पण सलमानच्या डोक्यात जीन्सचा विचार पक्का झाल्याचे लक्षात येताच मी गुडघ्यावर बसून सूट घालण्यासाठी त्याच्याकडे भीक मागितली असे करणने सांगितले.
 
माझा पहिला चित्रपट आहे. माझ्याबरोबर असे करु नको मी तुझ्याकडे भीक मागतो. पण तो सूट घाल. तुला चांगला दिसेल अशी गुडघ्यावर बसून मी त्याच्याकडे विनवणी केली. अखेर सलमान राजी झाला असे करणने सांगितले. 
 

Web Title: ... when Karan Johar asked for Salman
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.