VIDEO- पूनम पांडेचं हॉट अॅप गुगलकडून बॅन, तरीही करता येईल डाऊनलोड

By Admin | Published: April 19, 2017 02:57 PM2017-04-19T14:57:36+5:302017-04-19T15:20:48+5:30

हॉट आणि मादक अदांसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री पूनम पांडेनं दोन दिवसांपूर्वीच स्वतःचं अॅप लाँच केलं

VIDEO-Poonam Pandey's Hot App Googl Ban Ki, can still be downloaded | VIDEO- पूनम पांडेचं हॉट अॅप गुगलकडून बॅन, तरीही करता येईल डाऊनलोड

VIDEO- पूनम पांडेचं हॉट अॅप गुगलकडून बॅन, तरीही करता येईल डाऊनलोड

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - हॉट आणि मादक अदांसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री पूनम पांडेनं दोन दिवसांपूर्वीच स्वतःचं अ‍ॅप लाँच केलं होतं. या अ‍ॅपच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना मादक आणि बोल्ड सामग्री पाहायला मिळणार असल्याचं आश्वासनंही तिनं दिलं होतं. मात्र काही तासांच्या आतच गुगलनं पूनम पांडेचं हे अ‍ॅप बॅन केलं आहे. मात्र पूनम पांडेचा चाहतावर्ग अजूनही हे अ‍ॅप पुन्हा सुरू होण्याची वाट पाहतो आहे.

17 तारखेला मोठा गाजावाजा करत पूनम पांडेनं हे अॅप लाँच केलं होतं. त्यानंतर काही तासांनी गुगलनं हे अॅप बॅन केल्याची माहिती स्वतः पूनम पांडेनं टि्वटर हँडलरवरून दिली आहे. ट्विट करत ती म्हणाली, माझं अॅप आता गुगलवर उपलब्ध नाही आणि ते डाऊनलोड करण्यासाठी माझ्या चाहत्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. त्यानंतर तिने चाहत्यांना एका दुस-या लिंकवरून अॅप डाऊनलोड करण्याचं आवाहन केलं आहे. http://www.poonampandey.in/download  https://twitter.com/sachchaainsan/status/854368309302575105 या लिंकवरूनही तुम्ही हे अॅप डाऊनलोड करू शकता, असं तिने स्वतःच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.  

या अॅपमध्ये पूनम पांडेनं स्वतःच्या बोल्ड अंदाजातील तीन फोटो टाकले आहेत. ज्याला गुगलनं आक्षेप घेत हे अॅप बॅन केलं आहे. पूनम पांडे अॅपच्या बाजारात नवीन असल्यानेच उत्साहाच्या भरात तिने हे बोल्ड फोटो टाकले असावेत, त्यामुळेच गुगलनं हे अॅप बॅन केलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच पूनम पांडेनं सोशल मीडियावर अकाऊंटच्या सिक्रेट प्रोजेक्टसंदर्भात माहिती उपलब्ध करून दिली होती. ते सिक्रेट प्रोजेक्ट म्हणजे हे अॅप असल्याचा पूनम पांडेनं खुलासा केला आहे. पूनम पांडेच्या या अॅपला लाँच होताच 15 मिनिटांत जवळपास 15000 लोकांचे हिट्स मिळाले आहेत.

Web Title: VIDEO-Poonam Pandey's Hot App Googl Ban Ki, can still be downloaded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.