... म्हणून सैफ अली खान बदलणार तैमूरचे नाव

By Admin | Published: February 22, 2017 12:37 PM2017-02-22T12:37:08+5:302017-02-22T12:37:08+5:30

अभिनेता सैफ अली खान आपला मुलगा 'तैमूर'चे नाव बदलण्याचा विचार करत असल्याची माहित समोर आली आहे.

... as Timur's name will change Saif Ali Khan | ... म्हणून सैफ अली खान बदलणार तैमूरचे नाव

... म्हणून सैफ अली खान बदलणार तैमूरचे नाव

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 22 - अभिनेता सैफ अली खान आपला मुलगा 'तैमूर'चे नाव बदलण्याचा विचार करत असल्याची माहित समोर आली आहे. तैमूरच्या नावामुळे त्याला शाळेत कोणत्याही प्रकारे समस्या निर्माण होवो अथवा न होवो, तरीही सैफ त्याचे नाव बदलणार असल्याची शक्यता आहे.  
 
'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या बातमीनुसार, सैफने मुलगा तैमूरच्या नावासंदर्भात बोलताना सांगितले की,  केवळ नावामुळे तैमूरचा लोकांनी द्वेष करावा किंवा त्याची बदनामी व्हावी, अशी माझी इच्छा नाही. आजही लोकं तैमूरच्या नावाबाबत प्रश्न विचारतात, असेही सैफने सांगितले. 
 
यावर माझी मुलगी मला म्हणाली की,  'तिमूर लंगच्या नावावर तैमूरचे नाव ठेवण्यात आलेले नाही हे तुम्ही का सांगत नाही. तो तिमूर होता हा तैमूर, असे सांगा.' यावर मी म्हटले की, तरीही हे नाव ऐकण्यात एकसारखेच वाटते.  
 
तैमूर आणि तिमूर नाव मिळतंजुळतं आहे, मात्र दोन्ही नावांचा अर्थ वेगळा आहे. तैमूर नावाबाबत दिलेले स्पष्टीकरण काहींना पटलेदेखील आहे. त्यामुळे संपूर्ण जगाच्या प्रमाणपत्राची मला गरज वाटत नाही, असेही सैफने स्पष्ट केले आहे. 
 
करीनाचे देखील तैमूरचे नाव न बदलण्याचेच मत आहे.  लोकं आपल्यासोबत आहेत, आपल्या विचारांमुळे लोकं आपला आदर करतात, त्यामुळे आता माघार घेणे योग्य नाही, असेही ती म्हणाली. मात्र, नावामुळे भविष्यात आमच्या मुलाला नावाचा त्रास तर होणार नाही ना, हा प्रश्न आहे. 
 
त्यामुळे दबावापोटी मी सहका-यांच्या मदतीने कमी अक्षरांचा नाव शोधून काढली. पण ती विचित्र वाटत असल्याने मी ही कल्पना रद्द केली. दरम्यान, नावामुळे शाळेत तैमूरला अडचणींचा सामना करावा लागला तर मी त्याचे नाव बदलू शकतो. नाव बदलण्यासाठी मला उशीर होईल की नाही हे माहिती नाही. तरीही तैमूर हे नाव नेहमी त्याच्यासोबत जोडलेले असणार, असेही सैफने यावेळी सांगितले. 
 

Web Title: ... as Timur's name will change Saif Ali Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.