Subodh Bhave plays the role of father in 'Hardyantar' | ‘हृदयांतर’ चित्रपटात सुबोध भावे वडिलांच्या भूमिकेत...
‘हृदयांतर’ चित्रपटात सुबोध भावे वडिलांच्या भूमिकेत...

‘हृदयांतर’ या आगामी मराठी चित्रपटात सुबोध भावे महत्त्वाकांक्षी वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. पैशांच्या मागे धावताना नात्यांना दुय्यम दर्जा देणाऱ्या वडिलांची भूमिका त्याने साकारलीय. त्याने त्याचा या चित्रपटातील प्रवास अलीकडेच झालेल्या लोकमत आॅफिसमधील भेटीदरम्यान उलगडला. ‘हृदयांतर’ चित्रपटातील भूमिकेविषयी सुबोध भावे सांगतो, ‘या चित्रपटात मी कुटुंबाकडे दुर्लक्ष करणाऱ्या एका वडिलांची भूमिका साकारतो आहे. त्याच्याकडे पत्नी आणि मुलगी यांच्यासाठी अजिबातच वेळ नाहीये. स्वत:चे स्वप्न पूर्ण रताना घरातील इतर सदस्यांच्या इच्छा, अपेक्षांना मुरड बसतेय, हे त्याला कळत नाही. सध्याच्या काळातील प्रत्येक वडिलांचे प्रतिनिधित्व करणारी त्याची व्यक्तिरेखा आहे. क्वालिटी वेळ तो कधीच त्याच्या कुटुंबाला देऊ शकत नाही. अनेक कौटुंबिक अडचणी त्याच्या आयुष्यात येतात. त्याला त्याची चूक उमजते. कुटुंब ढासळण्यापूर्वी तो कुटुंबाला सावरतो, अशा आशयाची चित्रपटाची कथा आहे.
‘हृदयांतर’ चित्रपटात अभिनेत्री मुक्ता बर्वे समायरा जोशी ही भूमिका साकारत आहे. दोन मुलींच्या आईची तिने या चित्रपटात भूमिका साकारली आहे. आतापर्यंत मुक्ता बर्वेने अनेक चित्रपटांत विविध भूमिका साकारल्या आहेत. टोएब एन्टरटेन्मेटच्या सहयोगाने बनलेली यंग बेरी एन्टरटेन्मेट, इम्तियाज खत्री आणि विक्रम फडणीस प्रॉडक्शन निर्मित आणि विक्रम फडणीस दिग्दर्शित ‘हृदयांतर’ चित्रपट ७ जुलै २०१७ ला चित्रपटगृहात झळकणार आहे.

Web Title: Subodh Bhave plays the role of father in 'Hardyantar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.