उद्या रिलीज होणार 'स्त्रीलिंग-पुलिंग' वेबसीरिजचा पहिला धमाकेदार एपिसोड! 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 05:44 PM2019-01-02T17:44:19+5:302019-01-02T18:22:06+5:30

शुद्धदेसी मराठी आपली पहिली मराठी वेबसीरिज 'स्त्रीलिंग-पुलिंग' घेऊन येत आहे. सध्या या वेबसीरिजच्या धमाकेदार आणि बोल्ड ट्रेलरमुळे या वेबसीरिजची चर्चा सोशल मीडियात चांगलीच रंगली आहे.

Strilling Pulling marathi webserie's first episode releasing tomorrow | उद्या रिलीज होणार 'स्त्रीलिंग-पुलिंग' वेबसीरिजचा पहिला धमाकेदार एपिसोड! 

उद्या रिलीज होणार 'स्त्रीलिंग-पुलिंग' वेबसीरिजचा पहिला धमाकेदार एपिसोड! 

googlenewsNext

पल्लवी एक साधी-सरळ आणि सोज्वळ मुलगी... तिच्या जीवनात अचानक आलेल्या एका वादळाने ती पुरती हादरुन जाते. यातून कसं बाहेर यावं किंवा हे वादळ कसं रोखावं हे तिला सुचेनासं होतं. अशातच ती तिच्या दोन बेस्ड फ्रेन्ड प्रिया आणि अर्चना यांची भेट घेते. या मेत्रिणी काहीतरी मदत करतील या उद्देशाने घाबरलेली पल्लवी त्यांना तिच्यासोबत घडलेल्या नेमक्या प्रकाराबाबत सगळंकाही सांगते. पल्लवीसोबत घडलेला प्रकार ऐकून तिच्या मैत्रिणीही हादरतात आणि तिला मदत करण्याचा निर्णय घेतात. मग काय? या तिघी मेत्रिणी या सर्व गोंधळामागे असलेल्या व्यक्तीचा शोध घ्यायला लागतात. मग पुढे काय होतं? पल्लवीसोबत काय घडलं? यातून ती कशी बाहेर येते? तिला यातून बाहेर कोण काढतं? हे दाखवणारी कथा या 'स्त्रीलिंग-पुलिंग' वेबसीरिजची आहे. ही कथा एका मिशनवर निघालेल्या मैत्रिणींची आणि त्यांच्या मैत्रीची आहे. धमाल कॉमेडी आणि ड्रामा असलेल्या या वेबसीरिजचा पहिला एपिसोड उद्या म्हणजेच ३ जानेवारीला रिलीज होणार आहे. 

शुद्धदेसी मराठी आपली पहिली मराठी वेबसीरिज 'स्त्रीलिंग-पुलिंग' घेऊन येत आहे. सध्या या वेबसीरिजच्या धमाकेदार आणि बोल्ड ट्रेलरमुळे या वेबसीरिजची चर्चा सोशल मीडियात चांगलीच रंगली आहे. त्यासोबतच चर्चा होतीये, ती यातील यंग आणि फ्रेश स्टारकास्टमुळे. या वेबसीरिजचं लेखन-दिग्दर्शन 'चौर्य', 'यंटम' आणि 'वाघेऱ्या' या सिनेमाचं दिग्दर्शन करणारे समीर आशा पाटील यांनी केलं आहे. तर यात निखील चव्हाण, भाग्यश्री न्हालवे, सायली पाटील, आरती मोरे आणि ऋतुराज शिंदे यांच्या मुख्य भूमिका आहेत.

ट्रेलर बघा

ही कथा तीन जीवलग मैत्रिणी पल्लवी, अर्चना आणि प्रिया यांच्याभोवती फिरते. या तिघीही वेगवेगळ्या विचारांच्या आणि पार्श्वभूमीच्या आहेत. आणि तिघीही त्यांच्यासाठी मिस्टर परफेक्टच्या शोधात आहेत. यादरम्यान त्यांच्यासोबत असंकाही घडतं की, सगळं चित्र बदलून जातं. ते काय? हे उद्या म्हणजेच ३ जानेवारीला रिलीज होणाऱ्या पहिल्या एपिसोडमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. एकूण सहा एपिसोडची ही धमाकेदार वेबसीरिज प्रेक्षकांसाठी कॉमेडी आणि ड्रामाचा खजिनाच असणार आहे. 

या वेबसीरिजची जमेची बाजू म्हणजे यातील कलाकार. सर्वच तरुण आणि लोकप्रिय चेहऱ्यांनी यात जबरदस्त परफॉर्मन्सचा धमाका केला आहे. यातील काही पात्रांची आपण ओळख करुन घेऊ...

'लागिरं' फेम निखील चव्हाण

'लागिरं झालं जी' या लोकप्रिय मालिकेत सैनिकाची भूमिका साकारणारा निखील 'स्त्रीलिंग-पुलिंग'मध्ये तुम्हाला वेगळ्या एनर्जेटीक अशा रावडी भूमिकेत बघायला मिळणार आहे. त्याचं हे रुप तुम्हाला नक्कीच आवडेल. निखीलने यात सचिनची भूमिका साकारली आहे.

भाग्यश्री न्हालवे

भाग्यश्रीने या वेबसीरिजमध्ये पल्लवीची भूमिका साकारली आहे. भाग्यश्री ही भूमिका वेबसीरिजमधील मुख्य भूमिका आहे. पल्लवी ही साधी, सौज्वळ अशी एक मुलगी आहे, जी एका मोठ्या अडचणीत सापडली आहे. 

सायली पाटील

सायली ही या वेबसीरिजमध्ये प्रियाची भूमिका साकारते आहे. ती बोल्ड आणि ब्युटीफूल असं एक झकास कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे तिची ही भूमिकाही तुमच्या मनात घर करण्यासाठी सज्ज आहे. 

काय आहे शुद्धदेसी मराठी?

'स्त्रीलिंग-पुलिंग' या मराठी वेबसीरिजची निर्मिती शुद्धदेसी स्टु़डिओने केली आहे. शुद्धदेसी स्टु़डिओ ही एक मनोरंजन विश्वातील अशी निर्मिती संस्था आहे, जी वेबसीरिज, शॉर्टफिल्म आणि डॉक्युमेंट्री यांची निर्मिती करते. या संस्थेची ही पहिलीच मराठी वेबसीरिज असून येत्या काळात या निर्मिती संस्थेकडून मनोरंजनाचा खजिना तुम्हाला अनुभवता येणार आहे. 

कुठे बघाल वेबसीरिज?

ट्रेलर पाहून तुमची वाढलेली उत्सुकता आता अधिक न ताणता, याचा उद्या रिलीज होणार पहिला एपिसोड पाहण्यासाठी लॉग ऑन करा खालील दिलेल्या लिंकवर....

यूट्यूब

https://www.youtube.com/shudhdesimarathi/

फेसबुक पेज

https://www.facebook.com/ShudhDesiMarathi/

इन्स्टाग्राम हॅंडल

https://www.instagram.com/shudhdesimarathi/

शेअरचॅट App डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://b.sharechat.com/

Web Title: Strilling Pulling marathi webserie's first episode releasing tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.