श्रेयस तळपदेची मराठीत पुन्हा ग्रँड एंट्री

By Admin | Published: January 19, 2015 10:26 PM2015-01-19T22:26:31+5:302015-01-19T22:26:31+5:30

नवीन वर्षात प्रेक्षकांना मनोरंजनाचा डबल धमाका अनुभवायला मिळणार आहे, ती संधी निखिल महाजन दिग्दर्शित ‘बाजी’ या चित्रपटाद्वारे.

Shreyas Talpade's grand entry again in Marathi | श्रेयस तळपदेची मराठीत पुन्हा ग्रँड एंट्री

श्रेयस तळपदेची मराठीत पुन्हा ग्रँड एंट्री

googlenewsNext

नवीन वर्षात प्रेक्षकांना मनोरंजनाचा डबल धमाका अनुभवायला मिळणार आहे, ती संधी निखिल महाजन दिग्दर्शित ‘बाजी’ या चित्रपटाद्वारे. याचं कारण म्हणजे या चित्रपटातून अनेक वर्षांनी त्यांना आपला लाडका हीरो श्रेयस तळपदेला मराठी चित्रपटात पाहता येईल. शिवाय, यात तो नेहमीपेक्षा वेगळ्या अशा अँग्री यंग मॅनच्या भूमिकेत दिसेल. ६ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणारा ‘बाजी’ हा चित्रपट म्हणजे मराठीतील एक भव्यदिव्य कलाकृती. बॉलीवूडमध्ये रमलेला श्रेयस आठ वर्षांनंतर ‘बाजी’मधून मराठी चित्रसृष्टीत परततोय. चित्रपटातील बाजीची मुख्य आणि मध्यवर्ती भूमिका साकारण्यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली आहे. या सिनेमातील सर्व स्टंट्सही त्याने स्वत: केले आहेत. तलवार हातात बाळगणारा सुपरहीरो खरा वाटावा, यासाठी त्याने तलवारबाजीचं प्रशिक्षण घेतलं. तलवारबाजीचं हे प्रशिक्षण चित्रपटाचे अ‍ॅक्शन डायरेक्टर स्टंट सेल्वा यांनी श्रेयसला दिलं. श्रेयस म्हणाला, माझ्यातील अभिनय कौशल्याला ‘बाजी'मधून खूप चांगला वाव मिळालाय. 'इक्बाल'नंतरची जर कुठची आव्हानात्मक अशी भूमिका असेल, तर ती म्हणजे 'बाजी'! परफेक्शनिस्ट निखिल महाजन आणि एनर्जेटिक स्टंट सेल्वा यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच मी या चित्रपटातील अ‍ॅक्शन सीन्स करू शकलो. यात मी उत्तमपणे तलवार चालवलेली दिसेल. तलवारबाजीची कला शिकण्याची माझी लहानपणाची इच्छा आज या चित्रपटामुळे पूर्ण झाली.' श्रेयस तळपदेसोबत
प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर आणि जितेंद्र जोशी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका चित्रपटात आहेत. या चित्रपटाची निर्मिती दार मोशन पिक्चर्स, व्हर्च्यू एंटरटेनमेंट, एफलूएन्स मुवीस, आयएमई मोशन पिक्चर्स आणि ब्ल्यू ड्रॉप फिल्म्सने केली आहे.

Web Title: Shreyas Talpade's grand entry again in Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.