शाहिद कपूरसोबतच्या नात्याविषयी सानिया मिर्झाचे खुलासे

By Admin | Published: February 7, 2017 06:31 PM2017-02-07T18:31:12+5:302017-02-07T18:31:12+5:30

आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झा हिने कॉफी विथ करण या चॅट शोमध्ये शाहिद कपूर आणि तिच्या नात्याविषयी खुलासे केले आहेत.

Sania Mirza's revelations about the relationship with Shahid Kapoor | शाहिद कपूरसोबतच्या नात्याविषयी सानिया मिर्झाचे खुलासे

शाहिद कपूरसोबतच्या नात्याविषयी सानिया मिर्झाचे खुलासे

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 7 - आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झा हिने कॉफी विथ करण या चॅट शोमध्ये शाहिद कपूर आणि तिच्या नात्याविषयी खुलासे केले आहेत. करणच्या या शोमध्ये दिग्दर्शिका फराह खान आणि सानिया मिर्झाला एकत्रित आमंत्रण दिलं होतं. त्यावेळी शोदरम्यान करण जोहरनं सानियाला शाहिद कपूरशी असलेल्या कथित अफेअरबाबत प्रश्न विचारला तेव्हा तिनं या सर्व अफवा असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी शाहिद कपूर आणि सानियाच्या रिलेशनशिपवर उठलेल्या चर्चेच्या वादळावर अखेर पडदा पडला आहे.

त्यानंतर करण जोहरनं सानियाला अभिनेता रणवीर सिंग, रणबीर कपूर आणि शाहिद कपूर कलाकारांमधल्या कोणाशी लग्न करू इच्छिते, कोणाला मारू इच्छिते आणि कोणाला डेट करू इच्छिते?, असा प्रश्न विचारला. तेव्हा ती म्हणाली की, मी रणवीर सिंगला डेट करू इच्छिते, रणबीर कपूरशी लग्न करू इच्छिते आणि शाहिद कपूरला मारू इच्छिते. तिने शाहिद कपूरला मारू इच्छिते असं म्हटल्यानं बॉलिवूडसह क्रीडा क्षेत्रातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

काही वर्षांपूर्वी शाहिद कपूर आणि सानिया एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होती. शाहिदविषयी बोलताना तिने या सर्व गोष्टींना खूप दिवस उलटल्यामुळे मला फारसं काही आठवत नसल्याचं म्हटलं आहे. करिना कपूर आणि शाहिद कपूर यांचे ब्रेक अप झाल्यानंतर शाहिदचे नाव सानिया मिर्झासोबत जोडले गेले होते. त्यावेळी शाहीद कपूर आणि सानिया मिर्झाच्या अफेअरची बॉलिवूडमध्ये चर्चा होती.

Web Title: Sania Mirza's revelations about the relationship with Shahid Kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.