झाकिर हुसेन, सोनल मानसिंग यांच्यासह चार प्रतिभावंतांना संगीत नाटक अकादमीची फेलोशिप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 06:19 AM2019-07-17T06:19:11+5:302019-07-17T06:19:23+5:30

नर्तक व नृत्यदिग्दर्शक जतीन गोस्वामी, भरतनाट्यमचे नाणावलेले नर्तक व शिक्षक के. कल्याणसुंदरम पिल्लई या चार प्रतिभावंतांना संगीत नाटक अकादमीची फेलोशिप जाहीर झाली.

Sangeet Natak Akademi Fellowship with four talents including Zakir Hussain, Sonal Mansingh | झाकिर हुसेन, सोनल मानसिंग यांच्यासह चार प्रतिभावंतांना संगीत नाटक अकादमीची फेलोशिप

झाकिर हुसेन, सोनल मानसिंग यांच्यासह चार प्रतिभावंतांना संगीत नाटक अकादमीची फेलोशिप

googlenewsNext

नवी दिल्ली : जागतिक कीर्तीचे तबलावादक झाकिर हुसेन, नृत्यांगना सोनल मानसिंग, नर्तक व नृत्यदिग्दर्शक जतीन गोस्वामी, भरतनाट्यमचे नाणावलेले नर्तक व शिक्षक के. कल्याणसुंदरम पिल्लई या चार प्रतिभावंतांना संगीत नाटक अकादमीची फेलोशिप जाहीर झाली. अभिनेत्री सुहास जोशी, पार्श्वगायक सुरेश वाडकर, नाटककार राजीव नाईक यांच्यासह ४४ नामवंतांची ‘अकादमी रत्न’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. उपयोजित कलाक्षेत्रातील सर्वांगीण कामगिरीबाबत देण्यात येणारे पुरस्कार दिवानसिंह बजेली, पुरु दधिच यांना जाहीर झाला आहे. ही फेलोशिप प्रत्येकी ३ लाख रुपये व ‘अकादमी रत्न’ पुरस्कार प्रत्येकी १ लाख रुपयांचा आहे. विजेत्यांना ताम्रपत्र दिले जाईल. राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.
>अकादमी रत्न पुरस्कार विजेतेसंगीत : मणिप्रसाद (हिंदुस्थानी शास्त्रीय गायन), मधुप मुद्गल (गायन), तरुण भट्टाचार्य (संतूरवादन), तजेंद्र नारायण मजुमदार (सरोदवादन), अलामेलू मणि, मल्लाडी सुरीबाबू (कर्नाटकी शैलीचे गायन), के. कासिम व एस. बाबू (नागस्वरम), गणेश व कुमारेश (व्हायोलिन वादन), सुरेश वाडकर, शांती हिरानंद (सुगम संगीत), एच. आशानग्बी देवी (नट संकीर्तन).
नृत्य : राधा श्रीधर (भरतनाट्यम), इशिरा व मौलिक शाह (कथ्थक - पुरस्कार विभागून), अखाम लक्ष्मी देवी (मणिपुरी), सुरुपा सेन (ओडिशी), गोपिका वर्मा (मोहिनीअट्टम), तानकेश्वर हजारिका (बोर्बायन सत्तरिया), दीपक मजुमदार (समकालीन नृत्य), पशुमूर्ती रामलिंग शास्त्री (कुचिपुडी), तपनकुमार पट्टनायक (छाऊ).

नाटक : राजीव नाईक (नाट्यलेखन), लाल्तलुअंग्लिआना खिआंग्ते (नाट्यलेखन), संजय उपाध्याय (दिग्दर्शन), एस. रघुनंदन (दिग्दर्शन), सुहास जोशी (अभिनय), टिकम जोशी (अभिनय), स्वपन नंदी (माईम), भागवत ए. एस. नांजप्पा (यक्षगान), ए. एम. परमेश्वरन (कुटियाट्टम).
लोककला, लोकसंगीत इ. : मालिनी अवस्थी (लोकसंगीत), गाझी खान (बरना लोकसंगीत), नरिंदरसिंह (नेगी लोकसंगीत), निरंजन राज्यगुरू (गुजरात लोकसंगीत), मोहम्मद सादिक भगत (लोकनाट्य), कोटा सचिगानंद शास्त्री (हरिकथा), अर्जुन सिंग धुर्वे (लोकनृत्य), सोमनाथ बट्टू (लोकसंगीत), अनुपमा होसकेरे (कळसुत्री बाहुल्या सादरीकरण), हेमचंद्र गोस्वामी (मुखवटे निर्मिती).

Web Title: Sangeet Natak Akademi Fellowship with four talents including Zakir Hussain, Sonal Mansingh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.