रामकृष्ण हरी... शिवलीला पाटील यांची Big घोषणा, Boss महेश मांजरेकरांची मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 12:15 PM2021-10-04T12:15:53+5:302021-10-04T12:28:47+5:30

बिग बॉस 3 चा, शो सुरू होऊन एक आठवडा उलटला नाही तोच घरातील एक सदस्य असलेल्या शिवलीला पाटील घराबाहेर पडल्या होत्या. तत्पूर्वी त्यांनी कार्यक्रमामध्ये सांगितले की, इथला प्रत्येक माणूस माझा असेल

Ramkrishna Hari ... Shivlila tai Patil's big announcement, Mahesh Manjrekar's apology in big boss marathi 3 | रामकृष्ण हरी... शिवलीला पाटील यांची Big घोषणा, Boss महेश मांजरेकरांची मागितली माफी

रामकृष्ण हरी... शिवलीला पाटील यांची Big घोषणा, Boss महेश मांजरेकरांची मागितली माफी

googlenewsNext
ठळक मुद्देमी सध्या रुग्णालयात असून माझ्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे मी स्वत:हून या खेळातून बाहेर येण्याचा निर्णय घेत आहे. माझं शरीर मला साथ देत नाही, त्यामुळे मी तिथून बाहेर येण्याचा निर्णय स्वत:च्या मर्जीनं घेतला आहे

मुंबई - कलर्स मराठीवर सुरू असलेल्या बिग बॉस मराठी कार्यक्रमाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्राभर रंगते आहे. विशेष म्हणजे यंदा प्रसिद्ध किर्तनकार शिवलीला पाटील यांच्या एँट्रीमुळे या कार्यक्रमाची गाव-खेड्यापर्यंतच चर्चा रंगली. अनेकांनी शिवलीला यांच्या प्रवेशावर नाराजी व्यक्त केली होती, त्यातच बिग बॉसच्या घरात त्या आजारीही पडल्या. त्यामुळे, एकाच आठवड्यात त्यांनी बाहेर पडत त्या रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. मात्र, आता मी या खेळातून बाहेर पडत असल्याचं शिवलीला पाटील यांनी जाहीर केलं. तसेच, मी पुन्हा येणार नसल्याचे सांगत महेश मांजरेकर यांची माफीही मागितली. 

बिग बॉस 3 चा, शो सुरू होऊन एक आठवडा उलटला नाही तोच घरातील एक सदस्य असलेल्या शिवलीला पाटील घराबाहेर पडल्या होत्या. तत्पूर्वी त्यांनी कार्यक्रमामध्ये सांगितले की, इथला प्रत्येक माणूस माझा असेल. त्यांच्या या वाक्याने सदस्यांबरोबरच प्रेक्षकांची मनेदेखील जिंकली. पण, शिवलीला यांची प्रकृती अचानक ढासळली आणि बिग बॉस यांनी जाहीर केल्याप्रमाणे वैद्यकीय उपचारांकरिता काही काळ त्यांना बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जावे लागले. 29 सप्टेंबरपासून त्या घराबाहेर पडल्या होत्या. त्यामुळे, व्होटिंग लाईन्स बंद करण्यात आल्या होत्या. आता, मी घरात परत येणार नसल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. 

मी सध्या रुग्णालयात असून माझ्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे मी स्वत:हून या खेळातून बाहेर येण्याचा निर्णय घेत आहे. माझं शरीर मला साथ देत नाही, त्यामुळे मी तिथून बाहेर येण्याचा निर्णय स्वत:च्या मर्जीनं घेतला आहे. मी एक आठवड्याने पुन्हा येईन असा विश्वास महेश मांजरेकरांनी माझ्यावर दाखवला होता. त्याबद्दल मी त्यांची माफी मागते, या घरातील सर्वच लोकं चांगली आहेत. त्यातील, माझे आवडते विशाल दादा, मिनल, सोनाली, सुरेखा ताई या सगळ्या माझ्या आवडत्या आहेत, असे शिवलीला पाटील यांनी रुग्णालयातून बिग बॉसच्या सदस्यांनी संवाद साधताना म्हटलं. तसेच, सर्वांनी चांगलं खेळा, शारीरिक इजा करून घेऊ नका, माझ्या सर्वांना शुभेच्छा, माझ्याकडून जर सदस्यांना त्रास झाला असेल तर मी माफी मागते, असेही शिवलीला यांनी म्हटले. 

दोन नाव जास्त चर्चेत

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वामध्ये दोन सदस्यांची नावे जास्त चर्चेत आली. ती म्हणजे तृप्ती देसाई आणि शिवलीला बाळासाहेब पाटील. अत्यंत वेगळ्या क्षेत्रातून आलेल्या या दोन्ही महिलांनी पहिल्याच दिवसापासून प्रेक्षकांचे लक्ष आकर्षित केले. 

15 कलाकारांचा घरात प्रवेश 

मराठी सिनेइंडस्ट्रीतील चर्चित १५ कलाकार या घरात नांदणार आहेत. विशाल निकम, उत्कर्ष शिंदे, संतोष चौधरी, विकास पाटील, अविष्कार दारव्हेकर, मीरा जगन्नाथ, मीनल शाह, तृप्ती देसाई, गायत्री दातार, स्नेहा वाघ, जय दुधाने, सुरेखा कुडची, शिवलीला पाटील, सोनाली पाटील, अक्षय वाघमारे यांनी यंदा घरात प्रवेश केला आहे. आता शिवलीला बऱ्या होऊन पुन्हा कधी बिग बॉसच्या घरात परतणार, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

Web Title: Ramkrishna Hari ... Shivlila tai Patil's big announcement, Mahesh Manjrekar's apology in big boss marathi 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.