‘प्यार का पंचनामा’ हिट

By Admin | Published: October 20, 2015 03:56 AM2015-10-20T03:56:19+5:302015-10-20T03:56:19+5:30

या आठवड्यात असे दोन चित्रपट रिलीज झाले, ज्यांच्याकडून फारशी अपेक्षा नव्हती. दिल्लीच्या तीन मित्रांच्या लव्ह स्टोरीवर आधारित चित्रपट ‘प्यार का पंचनामा-२’ने सर्वांनाच आश्चर्यचकित

'Pyaar Ka Panchnama' hit | ‘प्यार का पंचनामा’ हिट

‘प्यार का पंचनामा’ हिट

googlenewsNext

या आठवड्यात असे दोन चित्रपट रिलीज झाले, ज्यांच्याकडून फारशी अपेक्षा नव्हती. दिल्लीच्या तीन मित्रांच्या लव्ह स्टोरीवर आधारित चित्रपट ‘प्यार का पंचनामा-२’ने सर्वांनाच आश्चर्यचकित करत बॉक्स आॅफिसवर चांगलीच झेप घेतली आहे. नव्या चेहऱ्यांचा समावेश असलेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ६.८० कोटींची ओपनिंग केली आहे. पहिल्या वीकेण्डला या चित्रपटाने २२.७५ कोटींचा व्यवसाय केला आहे.
या वर्षीच नाही, तर मागील काही वर्षांत नव्या चेहऱ्यांना घेऊन आलेल्या कोणत्याही चित्रपटाने पहिल्या वीकेण्डला एवढा व्यवसाय केलेला नाही. या वर्षातील हे सरप्राइज मानले जात आहे. समीक्षकांकडून कौतुक झाले नसले तरी चित्रपटाने केलेला व्यवसाय पाहता हे पुन्हा एकदा सिद्ध झाले की, अनिश्चिततेचे दुसरे नाव म्हणजे बॉलीवूड आहे. या क्षेत्रातील जाणकारांच्या मते दुबळे कथानक असूनही तरुणांना या चित्रपटातील काही सीन्स आवडले आहेत. विशेषत: उत्तर भारतात या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मुंबईतही चित्रपटाचा व्यवसाय चांगला
झाला आहे.
वेडिंग पुलाव या चित्रपटातही तसे नवे चेहरेच होते; पण बॉक्स आॅफिसवर हा चित्रपट फारसा प्रभाव दाखवू शकला नाही. पहिल्या तीन दिवसांतच या पुलावची स्थिती वाईट झाली. प्रेक्षकांनी हा स्वाद नसलेला पुलाव नाकारला. अनुष्का रंजनच्या लाँचिंग चित्रपटाला पहिल्या वीकेण्डला ५० लाखांचा व्यवसायही करता आला नाही. यापूर्वी रिलीज झालेल्या चित्रपटांबाबत बोलायचे झाले तर ऐश्वर्या राय-बच्चनच्या जज्बाने पहिल्या वीकेण्डला १५ कोटींचा व्यवसाय केला होता. दुसऱ्या वीकेण्डला याचे कलेक्शन २३ कोटी रुपये होते. जज्बामध्ये इरफान होता. विशेष म्हणजे इरफानचा आणखी एक चित्रपट तलवार बॉक्स आॅफिसच्या रेसमध्ये होता. संथ सुरुवात केलेल्या या चित्रपटाने तिसऱ्या आठवड्यापर्यंत २८ कोटींचे कलेक्शन केले आहे, जे समाधानकारक मानले जात आहे.
दसऱ्याच्या दिवशी शाहिद कपूर आणि आलिया भट्टचा शानदार येतोय. कंगनासोबत क्वीन बनविणाऱ्या दिग्दर्शक विकास बहलचा हा चित्रपट असून याचे जोरदार प्रमोशन होत
आहे.

Web Title: 'Pyaar Ka Panchnama' hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.