Prabhas work for sixteen hours! | प्रभास करतो तब्बल सोळा तास काम!
प्रभास करतो तब्बल सोळा तास काम!

दि ग्दर्शक एस.एस. राजामौली यांचा ‘बाहुबली’ चित्रपट रीलीज झाला आणि चाहत्यांसोबतच समीक्षकांनीही चित्रपटाचे कौतुक केले. आता संपूर्ण टीम ‘बाहुबली : द कन्क्ल्युजन’ या दुसऱ्या भागाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. बाहुबली म्हणजेच प्रभास हा तर जीव ओतून प्रत्येक सीन करत आहे. दिवसातून जवळपास १६ तास तो काम करतोय. संपूर्ण वेळ तो काही शूटिंगच करतोय असे नाही, तर शूटिंगनंतर तो वर्कआऊटदेखील करताना दिसतोय. यात प्रभास बरेच अ‍ॅक्शन सिक्वेन्स करणार आहे. २०१५मध्ये ‘बाहुबली : द बिगिनिंग’ चित्रपट आला आणि थिएटरमधून बाहेर पडताना सर्वांच्या डोक्यात एकच प्रश्न होता, ‘कटप्पा ने बाहुबली को क्यूँ मारा?’ आता लवकरच सर्वांना या प्रश्नाचे उत्तरही मिळणार आहे. मात्र, चित्रपटाची टीम प्रचंड मेहनत घेताना दिसते आहे.

Web Title: Prabhas work for sixteen hours!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.