आता बाहुबली पोहोचणार घराघरात

By Admin | Published: October 24, 2015 02:32 AM2015-10-24T02:32:36+5:302015-10-24T02:32:36+5:30

येत्या शुक्रवार पासून टीआरपी काढण्याची पद्धत बदलणार असून आतापर्यंत टीआरपी काढताना फक्त शहरी विभागाचा कल कुठल्या वाहिनीला अथवा मालिकांना आहे

Now Bahubali will reach home | आता बाहुबली पोहोचणार घराघरात

आता बाहुबली पोहोचणार घराघरात

googlenewsNext

येत्या शुक्रवार पासून टीआरपी काढण्याची पद्धत बदलणार असून आतापर्यंत टीआरपी काढताना फक्त शहरी विभागाचा कल कुठल्या वाहिनीला अथवा मालिकांना आहे ते पाहिले जात होते, मात्र आता यापुढे ग्रामीण भागालाही प्राधान्य देणार असल्याचे निरज व्यास यांनी नमूद केले.

बाहुबली या सिनेमाने बॉक्स आॅफिसवर कमाल केल्यानंतर आता सोनी मॅक्सवर हा चित्रपट प्रेक्षकांना २५ आॅक्टोबर २०१५ रोजी रात्री ८ वा. दाखवला जाणार आहे. या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर करण्याचा पहिला मान सोनी मॅक्सला मिळाला असून कटप्पाने बाहुबलीला कसे मारले हे सामान्य व्यक्तींपासून वृद्ध व्यक्तींनाही घरबसल्या पाहता येणार आहे.
बाहुबली सिनेमा पाहिल्यानंतर लगेचच या सिनेमाचा टेलिव्हिजन वर्ल्ड प्रीमियर सोनी मॅक्सवरच करायचा असा निर्णय घेतल्याचे सोनी मॅक्सचे उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख नीरज व्यास यांनी सांगितले. हा सिनेमा करण्यासाठी १२० करोड गुंतवले होते त्यामुळे सिनेमा चालावा, अशी अपेक्षा होती. मात्र प्रेक्षकांनी या सिनेमाला अपेक्षेपेक्षा अधिक पसंती दिल्याचे सिनेमाचे दिग्दर्शक एस. एस राजामौली यांनी सांगितले. हॉलीवूडमध्ये
एक सिनेमा तयार करताना तांत्रिक विभागासाठी तीन चमूंची आखणी केलेली असते त्या प्रत्येक
चमूमध्ये १००च्यावर मनुष्यबळ असते. मात्र भारतामध्ये तांत्रिक गोष्टींची कमतरता आढळते ही
खंतही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. तर बाहुबलीच्या दुसऱ्या भागाचे चित्रीकरण डिसेंबरपासून रामोजी फिल्मसिटी हैदराबाद येथे सुरू होईल. पुढील वर्षी सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांना पाहता येईल आणि तेव्हाच कटप्पाने बाहुबलीला का मारले हा सर्वांनाच पडलेला प्रश्न सुटेल, असे राजामौली यांनी आवर्जून सांगितले.

Web Title: Now Bahubali will reach home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.