श्रीदेवीने बनविला ‘नो लेट नाईट रुल..!’

By Admin | Published: June 26, 2017 01:13 AM2017-06-26T01:13:04+5:302017-06-26T01:13:04+5:30

मुली जेव्हा मोठ्या होतात तेव्हा विशेषत: आईला त्यांची जास्त काळजी वाटू लागते. मग ती आई कुणीही असो. की, त्यापैकी एक आई म्हणजे बालिवूड अभिनेत्री श्रीदेवी

'No Late Night Rule!' By Sridevi | श्रीदेवीने बनविला ‘नो लेट नाईट रुल..!’

श्रीदेवीने बनविला ‘नो लेट नाईट रुल..!’

googlenewsNext

मुली जेव्हा मोठ्या होतात तेव्हा विशेषत: आईला त्यांची जास्त काळजी वाटू लागते. मग ती आई कुणीही असो. की, त्यापैकी एक आई म्हणजे बालिवूड अभिनेत्री श्रीदेवी. जान्हवी आणि खूशी या श्रीदेवीच्या मुली असून त्यांची चिंता श्रीदेवीला सतावू लागली आहे. २०१६ साली जान्हवीचा बॉयफ्रेंड शिखर पहाडियाला किस करतानाचे फोटो व्हायरल झाले होते. ते फोटो पाहिल्यानंतर श्रीदेवीने जान्हवी आणि खूशी दोघांसाठीही ‘नो बॉयफ्रेंड रुल’ बनविला होता. मात्र आता जान्हवी कपूर ‘सैराट’ च्या रिमेकसाठी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची शक्यता असून तिच्या चित्रपटांत येण्यापूर्वी श्रीदेवीने अजून एक नवीन नियम बनविला आहे. ‘मी जान्हवी आणि खूशीसाठी काही नियम बनविले आहेत. दोघांना घरी कधी यायचे आणि किती वेळपर्यंत बाहेर थांबायचे हे चांगले माहीत आहे. जर त्यांना यायला लेट झाले तर मी त्यांना फोनवर फोन करणे सुरु करते.’ असे श्रीदेवीने सांगितले.

Web Title: 'No Late Night Rule!' By Sridevi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.