Nawaz is acting Prabhas acting 'Purkat'! | नवाजला प्रभासचा अभिनय वाटतो ‘पोरकट’!
नवाजला प्रभासचा अभिनय वाटतो ‘पोरकट’!

जे व्हापासून प्रभास स्टारर ‘बाहुबली-२’ हा रिलीज झाला तेव्हापासून सगळीकडे याच चित्रपटाचा बोलबाला आहे. तब्बल १६०० कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या या चित्रपटाने भारतीय सिनेसृष्टीतील सर्वच रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. कुठलेही प्रमोशन न करता या चित्रपटाने मिळविलेले अफाट यश अनेकांना कौतुकास्पद वाटत आहे. परंतु अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याला मात्र, ‘बाहुबली-२’ फारसा आवडला नाही. एका मुलाखतीदरम्यान नवाजुद्दीनने म्हटले की,‘बॉलिवूड किंवा इतर इंडस्ट्रीमधील कलाकारांना कसे ट्रीट केले जाते, हे ‘बाहुबली-२’ मधून दिसून आले आहे. जेव्हा चित्रपटाची लोकप्रियता वाढते तेव्हा अचानकच त्या कलाकाराचीही किंमत वाढते. मग त्या कलाकाराची भूमिका दमदार असो अथवा नसो, लोकप्रियतेपुढे सर्व काही माफ असते. यावेळी नवाजने कोणाचेही नाव न घेता प्रभासवर निशाणा साधला. नवाजने म्हटले की, ‘मला बाहुबलीमधील (हसून) तो रोल खूपच चांगला वाटला, काय ट्रिटमेंट दिली... म्हणजे कधी कधी... वास्तविक माझ्या मुलांच्या हट्टामुळे मी बाहुबली बघायला गेलो अन्यथा मी जाणार नव्हतो. हा चित्रपट बघण्यासाठी जेव्हा मी गेलो तेव्हा मला असे वाटले, की खरोखरच हा चित्रपट त्यांच्याकडे आकर्षित करून घेतो. चित्रपट बघताना तुम्हाला आनंद वाटतो. त्या अभिनेत्याला जी ट्रिटमेंट दिली गेली, कदाचित या जन्मात पुन्हा त्याला अशी ट्रिटमेंट मिळणार नाही, खरंच!’

Web Title: Nawaz is acting Prabhas acting 'Purkat'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.