ही प्रसिद्ध अभिनेत्री होणार मिथुन चक्रवर्तींची सून, उटीमध्ये होणार लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2018 01:12 PM2018-06-05T13:12:59+5:302018-06-05T13:18:13+5:30

उटी शहरात हे लग्न होणार असून बॉलिवूडचे मोठे कलाकार या लग्नाला हजर राहणार आहेत. 

Mithun Chakraborty daughter in law facts | ही प्रसिद्ध अभिनेत्री होणार मिथुन चक्रवर्तींची सून, उटीमध्ये होणार लग्न

ही प्रसिद्ध अभिनेत्री होणार मिथुन चक्रवर्तींची सून, उटीमध्ये होणार लग्न

googlenewsNext

 मुंबई : बॉलिवूडचे डान्सींग स्टार मिथुन चक्रवर्ती यांचा मोठा मुलगा मिमोह म्हणजेच महाक्षय चक्रवर्ती लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. मिमोह दिग्दर्शक-निर्माता सुभाष शर्मा यांची मुलगी अभिनेत्री मदालसासोबत लग्न करणार आहे. उटी शहरात हे लग्न होणार असून बॉलिवूडचे मोठे कलाकार या लग्नाला हजर राहणार आहेत. 

कोण आहे मदालसा?

मदालसाचे वडील सुभाष शर्मा हे दिग्दर्शक-निर्माता आहेत. सोबतच मदालसाती आई शीला शर्मा ही सुद्धा अभिनेत्री आहे. मदालसाने 2009 मध्ये आलेल्या फिटींग या सिनेमातून डेब्यू केलं होतं. त्यासोबतच तिने शौर्य या कन्नड सिनेमातही काम केलं आहे. 

...म्हणून उटीमध्ये होणार लग्न

महाक्षय आणि मदालसाचा साखरपुडा मार्चमध्ये झाला होता. मुंबईतील  Madh Island house मध्ये हा साखरपुडा पार पडला. पण यावेळी काही जवळच्याच लोकांना आमंत्रित करण्यात आलं होतं. आता लग्न उटीमध्ये ठेवण्यात आलं आहे. कारण उटी, मसिनागुडी आणि कर्नाटकात मिथुन यांचेअनेक हॉटेल्स आहेत. 

महाक्षयने 2008 मध्ये जिम्मीमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने द मर्डरर, हॉंटेड, लूट आणि रॉकी या सिनेमात काम केलं होतं. पण त्याला बॉलिवूडमध्ये फारसं यश मिळालं नाही. आता तो गामा या टीव्ही शोमध्ये बिझी आहे. 
 

Web Title: Mithun Chakraborty daughter in law facts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.