#MeToo: अनू मलिकची ‘इंडियन आयडॉल’मधून हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 06:13 AM2018-10-22T06:13:16+5:302018-10-22T06:14:26+5:30

‘मीटू’ प्रकरणात लैंगिक गैरवर्तनाचे आरोप झाल्यानंतर संगीतकार अनू मलिक यांची अखेर सोनी वाहिनीने ‘इंडियन आयडॉल’ या गाण्याच्या रिअ‍ॅलिटी शोच्या परीक्षक पदावरून हकालपट्टी केली आहे.

#MeToo: Extortion from Anu Malik's 'Indian Idol' | #MeToo: अनू मलिकची ‘इंडियन आयडॉल’मधून हकालपट्टी

#MeToo: अनू मलिकची ‘इंडियन आयडॉल’मधून हकालपट्टी

googlenewsNext

मुंबई : ‘मीटू’ प्रकरणात लैंगिक गैरवर्तनाचे आरोप झाल्यानंतर संगीतकार अनू मलिक यांची अखेर सोनी वाहिनीने ‘इंडियन आयडॉल’ या गाण्याच्या रिअ‍ॅलिटी शोच्या परीक्षक पदावरून हकालपट्टी केली आहे. यासंबंधीची घोषणा टिष्ट्वटर अकाउंटवरून करण्यात आली.
अनू मलिकवर श्वेता पंडित, सोना मोहपात्रा या दोन गायिकांसह चार महिलांनी लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले.
मलिक यांच्या घरी गेले असता, सोफ्यावर बाजूला येऊन बसले आणि त्यांनी माझा स्कर्ट वर करण्याचा प्रयत्न केला. मी पळण्याचा प्रयत्न केला, पण मला ते शक्य झाले नाही. नशिबाने तेव्हा कोणीतरी दार वाजवले, पण या प्रसंगाबाबत कोणाला काही न सांगण्याची धमकी त्यांनी मला दिली, असा एका महिलेचा आरोप आहे. दुसरा आरोप मलिकवर सोनी वाहिनीवरील रिअ‍ॅलिटी शोच्या माजी स्पर्धकाने केला. या आरोपांची गंभीर दखल घेत, वाहिनीने मलिक यांची परीक्षक पदावरून हकालपट्टी केली. त्यामुळे आता पार्श्वगायिका नेहा कक्कर आणि संगीतकार विशाल दादलानी हे दोघेच ‘इंडियन आयडॉल’चे परीक्षक असतील.

Web Title: #MeToo: Extortion from Anu Malik's 'Indian Idol'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.