Lokmat Most Stylish Awards 2019: यामी गौतम हिने देशवासियांना CAA बाबत शांतता राखण्याचे केले आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 10:34 PM2019-12-18T22:34:19+5:302019-12-18T22:35:19+5:30

लोकमत मोस्ट स्टायलिश पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर उपस्थित असलेल्या यामी गौतम हिने देशातील सध्याच्या परिस्थितीवर आपली भूमिका मांडली.

Lokmat Most Stylish Awards 2019: Yami Gautam urges to keep peace on CAA | Lokmat Most Stylish Awards 2019: यामी गौतम हिने देशवासियांना CAA बाबत शांतता राखण्याचे केले आवाहन 

Lokmat Most Stylish Awards 2019: यामी गौतम हिने देशवासियांना CAA बाबत शांतता राखण्याचे केले आवाहन 

googlenewsNext

मुंबई - लोकमत समुहाचा लोकमत मोस्ट स्टायलिश पुरस्कार सोहळा मुंबईत सुरू आहे. या सोहळ्याला उपस्थित असलेली अभिनेती यामी गौतम हिने सध्या देशात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सुरू असलेल्या हिंसक आंदोलनाबाबत आपले मत मांडले आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत (CAA) शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. 

लोकमत मोस्ट स्टायलिश पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर उपस्थित असलेल्या यामी गौतम हिने आपले व्यक्तिमत्त्व नेहमी स्टाइलमध्ये राखले पाहिजे, असा सल्ला दिला. ती म्हणाली, ''आपले व्यक्तिमत्त्व नेहमीच फॅशन स्टाइलमध्ये राखले पाहिजे. मला वाटते स्टाइलबाबत विविध एक्पिरिमेंट करत राहिले पाहिजे.'' 



''एका वर्षातून मी कुणाची स्टायलिश म्हणून निवड करू शकत नाही. मात्र माझ्या मते रणबीर कपूर सर्वाधिक स्टायलिश आहे. तसेच अभिनेत्रींबाबत बोलायचे तर डेली डायना सर्वाधिक स्टायलिश आहे'', असे तिने सांगितले. 

Web Title: Lokmat Most Stylish Awards 2019: Yami Gautam urges to keep peace on CAA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.