Lokmat Most Stylish Awards: सनी लिओनीचं मराठी, शिल्पाची अदाकारी, सारा-अनन्याची जुगलबंदी अन् सिद्धू-सिद्धार्थनं मनं जिंकली!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 09:28 PM2021-12-03T21:28:55+5:302021-12-03T21:39:59+5:30

Lokmat Most Stylish Awards: विविध क्षेत्रांमधील स्टायलिश व्यक्तीमत्त्वांचा लोकमतकडून सन्मान; दिमाखदार सोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती

lokmat facilitates most stylish personality from film fashion fitness politics field | Lokmat Most Stylish Awards: सनी लिओनीचं मराठी, शिल्पाची अदाकारी, सारा-अनन्याची जुगलबंदी अन् सिद्धू-सिद्धार्थनं मनं जिंकली!

Lokmat Most Stylish Awards: सनी लिओनीचं मराठी, शिल्पाची अदाकारी, सारा-अनन्याची जुगलबंदी अन् सिद्धू-सिद्धार्थनं मनं जिंकली!

Next
ठळक मुद्देविविध क्षेत्रांमधील स्टायलिश व्यक्तीमत्त्वांचा लोकमतकडून खास सन्मानसिद्धार्थ जाधव, रोहित शेट्टी, सिद्धार्थ मल्होत्रा, सारा अली खान यांचा गौरवसनीचं मराठी, सारा, अनन्याचा भन्नाट डान्स; 'स्टायलिश' सोहळ्याला चार चाँद

मुंबई: लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड सोहळा काल मोठ्या स्टायलिश अंदाजात संपन्न झाला. बॉलिवूडचे तारे तारका, मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज कलाकारांनी कार्यक्रमाला चार चाँद लावले. सिद्धार्थ मल्होत्रानं त्याच्या चाहतीसोबत केलेला उत्स्फूर्त डान्स, गप्प बस म्हणत सनी लिओनीनं मराठीत केलेली सुरुवात, अरमान मलिकनं गायलेलं सुंदर गाणं यामुळे उपस्थित हरखून गेले.

मनोरंजन, उद्योग, राजकारणातील स्टायलिश व्यक्तीमत्त्वांचा सन्मान मोस्ट स्टायलिश अवॉर्ड सोहळ्याच्या माध्यमातून केला जातो. यंदाचा सोहळा सहारा स्टारमध्ये संपन्न झाला. या सोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती होती. अभिनेता सिद्धार्थ जाधवचा मोस्ट स्टायलिश एंटरटेनर म्हणून गौरव करण्यात आला. सिंबा, सूर्यवंशी या चित्रपटात सिद्धार्थनं केलेल्या कामाचं बॉलिवूडमध्ये अनेकांनी कौतुक केलं. त्याबद्दल त्याला लोकमतकडून सन्मानित करण्यात आलं. आपल्या लोकांनी केलेलं कौतुक फार मोलाचं आहे. ही शाबासकीची थाप मला आणखी छान काम करण्याची ऊर्जा देईल. अशा शब्दांत सिद्धार्थनं आभार मानत त्याच्या भावना व्यक्त केल्या.

दिग्दर्शक रोहित शेट्टीनं सिद्धार्थचं तोंडभरून कौतुक केलं. सिद्धार्थला पुरस्कार दिला जात असताना सारा अली खानदेखील मंचावर आली. त्यानंतर रोहित आणि सिद्धार्थनं साराची मस्करी सुरू केली. विशेष म्हणजे साराला याची कल्पना आधीच आली होती. तिनंदेखील मस्करीत सहभाग घेतला. सिद्धार्थदेखील रोहित शेट्टीचं कौतुक करताना थांबत नव्हता. आता रोहित शेट्टी स्वत:चं म्हणतील, बस कर पगले रुलाएगा क्या, असं म्हणत सिद्धार्थ थांबला. त्यावेळी शेजारी उभ्या असलेल्या रोहित शेट्टीला हसू आवरत नव्हतं. नव्या सिनेमाच्या शूटला सुरुवात करायचीय. त्यातही सिद्धार्थ आहे. म्हणून आता तो माझं इतकं कौतुक करतोय, अशा शब्दांत रोहितनं सिद्धार्थला टोला लगावला.

लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड सोहळ्यात आणखी एक सिद्धार्थ लक्षवेधी ठरला. अभिनेत्रा सिद्धार्थ मल्होत्राचा मोस्ट स्टायलिश ॲक्टर ऑफ द इयर पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. पुरस्कार स्विकारल्यानंतर सिद्धार्थनं एका चाहतीसोबत रेट्रो गाण्यांवर भन्नाट डान्स केला. सिद्धार्थच्या शेरशहा चित्रपटातील अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. त्यात कॅप्टन विक्रम बत्रा साकारणाऱ्या सिद्धार्थला भेटण्यासाठी लुधिनायाहून १५ ते २० तरुणी आल्या होत्या. त्यांना स्टेजवर भेटून, त्यांच्या सोबत सेल्फी काढत सिद्धार्थनं त्यांना एक गोड आठवण दिली.

बोल्ड अभिनेत्री सनी लिओनीला मोस्ट स्टायलिश फॅशनिस्टा पुरस्करानं गौरवण्यात आलं. विशेष म्हणजे या सोहळ्यात सनी अनपेक्षितपणे मराठी बोलली. बियुनिकचा निकुंज लोटिया आणि सूत्रसंचालक सचिन कुंभार मस्करी करत असताना सनी अचानक त्यांना गप्प बस म्हणाली. मला या शब्दाचा अर्थदेखील माहीत आहे, असंही तिनं सांगितलं. सनीला मराठीतले काही शब्द, काही वाक्यं येतात, हा सगळ्यांसाठीच आश्चर्याचा धक्का होता.

एकापेक्षा एक सुंदर गाणी गाऊन श्रोत्यांच्या मनात घर करणारा अरमान मलिक मोस्ट स्टायलिश सिंगर पुरस्काराचा मानकरी ठरला. पुरस्कार स्विकारल्यानंतर त्यानं त्याच्या सुरेल आवाजात बार बार देखो चित्रपटातील सौ आसमान गाणं सादर करत उपस्थितांची वाहवा मिळवली. मोस्ट स्टायलिश युथ आयकॉन सिंगर ऑफ द इयर ठरलेल्या जसलिन रॉयलनं शेरशहा चित्रपटातलं रांझा गाणं सादर करत सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं.

आपल्या दमदार भूमिकांनी रसिकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या मनोज वाजपेयींना मोस्ट स्टायलिश व्हर्सटाईल ऍक्टर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तर सारा अली खान मोस्ट स्टायलिश पॉवरहाऊस परफॉर्मर ठरली. सारानं अनन्या पांडेसोबत चका-चक गाण्यावर जबरदस्त डान्स करत डबल धमाका केला. अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही पोरी साजूक तुपातली गाण्यावर थिरकली. 

Web Title: lokmat facilitates most stylish personality from film fashion fitness politics field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app