एका असामान्य मुलीची प्रेरणादायी कहाणी 'सिंधू'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 07:53 PM2020-07-23T19:53:18+5:302020-07-29T21:15:36+5:30

सिंधूने समाजाच्या प्रथेला हसतमुखाने विरोध केला. यात तिला काय काय अडचणी आल्या किंवा तिने त्यावर कशी मात केली हे या सीरिजमध्ये बघायला मिळतं.

Inspirational story of Sindhu on zee 5 app | एका असामान्य मुलीची प्रेरणादायी कहाणी 'सिंधू'

एका असामान्य मुलीची प्रेरणादायी कहाणी 'सिंधू'

googlenewsNext
ठळक मुद्देएका महिलेचा प्रेरणादायी प्रवास दाखवणारी सीरिज 'सिंधू' सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.सिंधू नावाची मुलगी ही बालविवाह प्रथेविरोधात उभी राहणारी, शिक्षणाची आवड असणारी मुलगी आहे. १९ व्या शतकात ही कथा घडते आणि तो काळ अगदी तसाच्या तसा उभा करण्यात निर्माता-दिग्दर्शकांना यश आलंय.

ZEE5 हे App डिजिटल मनोरंजन विश्वातील प्रमुख App ठरत आहे. वेगवेगळ्या वयोगटातील प्रेक्षकांसाठी वेगवेगळ्या भाषेतील वेबसीरिजच या प्लॅटफॉर्मवर बघायला मिळतात. “Watching content anytime; anywhere” हे ZEE5 चं स्लोगन आहे आणि त्यानुसार प्रेक्षकांचं यावर मनोरंजन केलं जातं. १८ ते ३५ वयोगटातील महिलांसाठी यावर बऱ्याच सीरिज आहेत. अशीच एक महिलाप्रधान किंवा एका महिलेचा प्रेरणादायी प्रवास दाखवणारी सीरिज 'सिंधू' सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

सिंधू ही एका असाधारण मुलीची आणि तिच्या लढ्याची कहाणी आहे. सिंधू नावाची मुलगी ही बालविवाह प्रथेविरोधात उभी राहणारी, शिक्षणाची आवड असणारी आहे. पण इतक्या लहान वयात समाजातील ही प्रथा मोडणं, त्याविरोधात उभं राहणं हे तिच्यासाठी अजिबात सोपं नव्हतं. सिंधूने समाजाच्या प्रथेला हसतमुखाने विरोध केला. यात तिला काय काय अडचणी आल्या किंवा तिने त्यावर कशी मात केली हे या सीरिजमध्ये बघायला मिळतं.

ही सीरीज इतर सीरीजपेक्षा वेगळी ठरते कारण यात एका मुलीचा प्रेरणादायी प्रवास त्यात बघायला मिळतो. एका मुलीचा समाजाच्या विरोधातील लढा बघायला मिळतो. याने आपल्याला प्रेरणा तर मिळतेच सोबतच मनोरंजनही होतं. या सीरीजची खासियत म्हणजे यात सिंधूसहीत जवळपास सगळेच चेहरे नवीन आहेत. तरीही, आपल्या कसदार अभिनयाने ते प्रेक्षकांना खिळवून ठेवतात.

या सीरीजमधून महिलांचं मनोरंजन तर होईलच, सोबत त्यांना जीवनात पुढे जाण्याच्या अनेक गोष्टी शिकायला मिळतील. स्वप्नं बघा, त्यांचा पाठलाग करा, मनाचं ऐका, आपल्या हक्कांसाठी उभ्या राहा, सुशिक्षित व्हा, नवीन गोष्टी शिका, तुम्हाला आवडत्या गोष्टी करा, हेच ही मालिका शिकवते.

सिंधू सीरीजचं वैशिष्ट्य म्हणजे १९ व्या शतकात ही कथा घडते आणि तो काळ अगदी तसाच्या तसा उभा करण्यात निर्माता-दिग्दर्शकांना यश आलंय. याने प्रेक्षक कथेशी एकरूप होण्यास मदत होते. त्या काळातील अनेक चालीरिती माहिती होतात. त्यापैकी काहींमधल्या चुका ठळकपणे जाणवतात. महिलांना कसं ठरावीक गोष्टीत बांधून ठेवलं जात होतं हे दिसून येतं. पण सिंधू त्याविरोधात उभी ठाकली आहे. सिंधूच्या या कथेतून केवळ बालविवाह नाही, तर जातीवाद, लिंगभेद अशाही विषयांवर यातून भाष्य करण्यात आलं आहे.

यातील सिंधूची भूमिका करणाऱ्या अदिती जलतराने तिची भूमिका फारच चोख बजावली आहे. लहान असून एक महत्त्वाकांक्षी आणि विचारी मुलगी तिने फारच चपखलपणे साकारली आहे. तर तिच्यासोबतच गौरी किरण, शाश्वती पिंपळीकर, श्रीहरी अभ्यंकर, वेद आंब्रे, सौरभ सुतार आणि विशाखा इमानदार या सर्वांनी आपल्या भूमिकांना योग्य तो न्याय दिला आहे.

आता सिंधू समाजातील या अनिष्ट प्रथांविरोधात कसा लढा देते, त्यासाठी तिला कुणाची मदत मिळते, त्यात ती कशी यशस्वी ठरते हे जाणून घेण्यासाठी आणि तिच्याकडून प्रेरणा घेण्यासाठी ही सीरीज तुम्हाला ZEE5 वर बघावी लागले. ही सीरीज तुम्ही कधीही कुठेही ZEE5 वर रोज रात्री ८ वाजता बघू शकता. आधीच ही सीरीज सुरू झाली असली, तरी जुनेही एपिसोड App वर बघता येतील.

Web Title: Inspirational story of Sindhu on zee 5 app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.