मुक्ता बर्वेसोबत हृतिक रोशनचे मराठीत पदार्पण

By Admin | Published: March 2, 2017 10:09 AM2017-03-02T10:09:34+5:302017-03-02T10:29:59+5:30

विख्यात फॅशन डिझायनर विक्रम फडणीसच्या 'हृदयांतर' या मराठी चित्रपटात हृृतिक रोशन विशेष भूमिकेत दिसणार आहे.

Hrithik Roshan's debut in Marathi with Mukta Barve | मुक्ता बर्वेसोबत हृतिक रोशनचे मराठीत पदार्पण

मुक्ता बर्वेसोबत हृतिक रोशनचे मराठीत पदार्पण

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २ - प्रियांका चोप्रा, सलमान खान, जॅकी श्रॉफ, विद्या बालन, हुमा कुरेशी या कलाकारांपाठोपाठ बॉलिवूडचा आणखी एक प्रसिद्ध चेहरा मराठी चित्रपटात दिसणार आहे. आणि तो अभिनेता म्हणजे बॉलिवूडचा सुपरहिरो अभिनेता हृतिक रोशन.. विख्यात फॅशन डिझायनर विक्रम फडणीस ' हृदयांतर' या मराठी चित्रपटातून दिग्दर्शनात पाऊल टाकत असून याच चित्रपटात हृतिकची विशेष भूमिकेत झळकणार आहे. खुद्द हृतिकनेच ट्विटरवरून याची माहिती दिली असून त्याने विक्रम आणि मुक्ताबर्वेसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. 
'हृदयांतर' या चित्रपटात गुणवंत अभिनेत्री मुक्ता बर्वे तसेच सुबोध भावे याची मुख्य भूमिका आहे.. काही महिन्यांपूर्वी बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान या चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला होता.  

Web Title: Hrithik Roshan's debut in Marathi with Mukta Barve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.