Hrithik Roshan to hit Shah Rukh Khan? | हृतिक रोशन स्टाइलमध्ये शाहरुख खानला पछाडणार?
हृतिक रोशन स्टाइलमध्ये शाहरुख खानला पछाडणार?

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान याचा ‘रईस’ व हृतिक रोशनचा ‘काबिल’ या चित्रपटांची बॉक्स आॅफिसवर लढत होत आहे. दोन्ही चित्रपट वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आहेत. दोन्ही चित्रपटांत अनेक गोष्टींचे साम्यदेखील आहे. मात्र अशातच दोन्ही चित्रपटांतील कलाकारांची ‘स्टाइल’ चांगलाच चर्चेचा विषय ठरली आहे.‘रईस’मध्ये शाहरुख खान नव्या अवतारात चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. ‘रईस’ची कथा ८०च्या दशकातील असल्याने त्या काळातील कॉश्च्युमचा वापर करण्यात आले आहेत. ‘बेल बॉटम’ पँट, शर्टाच्या मोठ्या कॉलर, हलक्या रंगाचे कपडे हे रईसमधील शाहरुख खानच्या कॉश्च्युमचे वैशिष्ट्य. ‘रईस‘मध्ये शाहरुख खान गरीब घरात जन्मलेला व श्रीमंत झालेला व्यक्ती होतानाचा प्रवास दाखविण्यात आल्याने त्याच्या कॉश्च्युममधून त्याचा प्रवास दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ‘रईस’ची कॉश्च्युम डायरेक्टर शीतल शर्मा हिने शाहरुखच्या लूकसोबत नवे प्रयोग केले आहेत. ‘रईस’मधील पठाणी घाललेला शाहरुखच्या लूकची जबरदस्त क्रेझ चाहत्यांत निर्माण झाली आहे. ‘रईस’मधील शाहरुख खानने परिधान केलेली ‘पठाणी’ स्टाइलची कॉपी करताना दिसत आहेत. शाहरुख खानची स्टाइल त्याचे चाहते फॉलो करीत असतात. दुसरीकडे हृतिक रोशनने ‘काबिल’ या चित्रपटात एका युवकाची अंध व्यक्तीची भूमिका साकारली आहे. हृतिक रोशनने आजपर्यंत केलेल्या भूमिकेच्या उलट ‘काबिल’मधील भूमिका असल्याने त्याला भूमिकेअनुरूप योग्य लूक देणे हे कठीण होते. काबिलच्या कॉश्च्युम डायरेक्टर करिश्मा आचार्य व नाहीद शाह यांना यासाठी बरीच मेहनत करावी लागली आहे. ‘काबिल‘चा ट्रेलर पाहिल्यावर हृतिकचे कॉश्च्युम आकर्षक असल्याचे दिसते. ‘काबिल’च्या पूर्वार्धात हृतिक रोमँटिक भूमिकेत दिसणार असल्याने त्याचे कॉश्च्युमही साधे ठेवण्यात आले आहेत. पूर्वार्धात साध्या शर्ट-पँट किंवा टी-शर्ट व जिन्समध्ये दिसणारा हृतिक अधिकच स्टायलीश दिसतो आहे. तर उत्तरार्धात अंध हृतिक आपल्या पत्नीच्या हत्येचा बदला घेणारा चाणाक्ष अंध व्यक्तीची रंगविणार असल्याने त्याचे कॉश्च्युम भूमिका अधिक प्रभावी करणारे असल्याचे दिसतात. ‘काबिल’मध्ये हृतिकने परिधान केलेले जॅकेट्स व टी शर्ट युवकांत चांगलेच फेमस होत आहेत. हृतिक रोशनची स्टाइल ही कोणत्याही युवकाला भुरळ घालू शकते. यापूर्वीच्या हृतिकच्या चित्रपटाचा अनुभव पाहता त्याची स्टाईल लवकर अडॉप्ट केली जाते असे दिसते.

Web Title: Hrithik Roshan to hit Shah Rukh Khan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.