HAPPY BIRTHDAY: Know some special things from Babli Shraddha Kapoor | HAPPY BIRTHDAY : जाणून घेऊया बबली श्रद्धा कपूरच्या काही खास गोष्टी
HAPPY BIRTHDAY : जाणून घेऊया बबली श्रद्धा कपूरच्या काही खास गोष्टी

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 3 - बॉलिवूडमधील सुंदर, चुलबुली आणि क्युट अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज 30वा वाढदिवस आहे. 3 मार्च 1987 रोजी श्रद्धाचा मुंबईमध्ये जन्म झाला. बॉलिवूडमधील व्हिलन शक्ती कपूरची मुलगी श्रद्धाने आज बॉलिवूडमध्ये आपलं वेगळे स्थान निर्माण केले आहे. सुपरहिट सिनेमा 'आशिकी-2' मुळे श्रद्धाची हटके अशी ओळख निर्माण झाली आहे.  अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केलेली श्रद्धा एक उत्कृष्ट गायिकादेखील आहे.   
 
वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया श्रद्धा कपूरबाबतच्या काही गोष्टी :
 
श्रद्धाचे वडील शक्ती कपूर पंजाबी आहेत आणि आई शिवांगी मराठमोळी.  श्रद्धाला एक  भाऊदेखील आहे.  सिद्धार्थ कपूर असे त्याचे नाव आहे. 
 
श्रद्धा कपूरचे अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे, दिग्दर्शक तेजस्विनी कोल्हापूर, ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि लता मंगेशकर यांच्याशीही नाते आहे. या चौघींची श्रद्धा भाची आहे.
 
सिनेनिर्माता संजय लीला भन्साली यांनी श्रद्धा कपूरला त्यांचा सिनेमा 'माय फ्रेंड पिंटो' मधून काढले होते. श्रद्धाऐवजी त्यांनी कल्किची निवड केली होती. यामुळे श्रद्धा खूप दुखावली गेली. या कारणामुळे जवळपास तीन दिवस रडतदेखील होती. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, श्रद्धाला अभिनय क्षेत्रातचे आपली कारर्कीद करायची होती. पदवीधर झाल्यानंतर तिन बोस्टर युनिव्हर्सिटीत अॅडमिशन घेतले. मात्र यादरम्यान, तिला 'तीन पत्ती' सिनेमा मिळाल्याने तिने शिक्षण मध्यातच सोडले. 'तीन पत्ती'मध्ये तिने एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीची भूमिका साकारली होती.  या सिनेमात अमिताभ बच्चन, आर माधवन यांची महत्त्वाची भूमिका होती. 
 
यानंतर  'लव्ह का दि एंड' या सिनेमातही तिनं काम केले. मात्र 2013 साली आलेल्या 'आशिकी -2' सिनेमामुळे श्रद्धा कपूर प्रकाशझोतात आली. बॉक्सऑफिसवर हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. 100 कोटी रुपयांहून अधिक कमाई या सिनेमाने केली. 
 
2013 मध्ये एफएचएम इंडियाद्वारे करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात सर्वात सुंदर 100 महिलांमध्ये श्रद्धा पाचव्या स्थानावर होती. 
 
2014 मध्ये श्रद्धाने सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'एक व्हिलन' सिनेमा केला. या सिनेमानंही बॉक्सऑफिसवर 100 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली.
 
श्रद्धाने बॉलिवूडमध्ये आशिकी 2, हैदर, उंगील, एबीसीडी 2, बागी, अ फ्लाइंग जेट, रॉक ऑन 2 आणि ओके जानू या सिनेमांमध्ये काम केले आहे. 
 
सध्या श्रद्धा हाफ गर्लफ्रेंड या तिच्या आगामी सिनेमाच्या कामात व्यस्त आहे. 
Web Title: HAPPY BIRTHDAY: Know some special things from Babli Shraddha Kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.