दीपिकाचे हॉट फोटो शूट

By Admin | Published: June 2, 2014 09:01 AM2014-06-02T09:01:30+5:302014-06-02T09:01:30+5:30

आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने एका मासिकासाठी ‘हॉट फोटो’ दिले आहेत. मासिकाच्या मुखपृष्ठावर या सुंदरीचा फोटो झळकणार आहे.

Deepika's Hot Photo Shoot | दीपिकाचे हॉट फोटो शूट

दीपिकाचे हॉट फोटो शूट

googlenewsNext

आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने एका मासिकासाठी ‘हॉट फोटो’ दिले आहेत. मासिकाच्या मुखपृष्ठावर या सुंदरीचा फोटो झळकणार आहे. पांढरा शर्ट परिधान केलेली, परंतु शर्टचे बटन उघडे असलेल्या अवस्थेतील दीपिका मुखपृष्ठावर झळकणार आहे. आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकणारी दीपिका ‘सेक्सी लूक’मध्ये दिसणार आहे. दीपिकाने डोळ्यामध्ये काजळ घातले आहे. तिचा एक हात कमरेवर असून, गळ्यात हिर्‍याचा हार घातला आहे. केस मोकळे असून, ते पुढे आले आहेत, अशा अवस्थेत दीपिकाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे. ‘फोटो शूट’च्या वेळी दीपिकाने सव्यासाची मुखर्जी, मनीष मल्होत्रा, शंतनू आणि निखिल यांनी डिझाईन केलेले ड्रेस परिधान केले होते. या फोटो शूटद्वारे मासिकाने दीपिकाच्या सौंदर्याची रहस्ये उलगडली आहेत.

Web Title: Deepika's Hot Photo Shoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.