CNX Masti Is Now Lokmat Manoranjan | सीएनएक्स मस्ती आता बनलंय लोकमत मनोरंजन
सीएनएक्स मस्ती आता बनलंय लोकमत मनोरंजन

एन्टरटेन्मेंटच्या जगात काय काय सुरू आहे याची उत्सुकता नेहमीच लोकांना लागलेली असते. एन्टरटेन्मेंट विश्वातली प्रत्येक बातमी लोकांपर्यंत अतिशय जलद गतीने  पोहोचवण्याचे काम सीएनक्स मस्ती करत आहे. पण आता हेच लोकांचे आवडते सीएनक्स मस्ती आता लोकमत मनोरंजन बनणार आहे.

सीएनक्स मस्ती गेल्या तीन वर्षांपासून लोकांपर्यंत एन्टरटेन्मेंट क्षेत्रातील विविध बातम्या पोहोचवत होते. बॉलिवूड, मराठी, टेलिव्हिजिन, हॉलिवूड या सगळ्याच इंडस्ट्रीत काय सुरू आहे याच्या अगदी योग्य आणि विश्वसनीय बातम्या लोकांना सीएनक्स मस्तीवर वाचायला मिळत होत्या. एवढेच नव्हे तर अनेक एक्सक्ल्युझिव्ह बातम्या मिळण्याचे हे एकमेव ठिकाण असल्याने लोकांचा खूपच चांगला प्रतिसाद सीएनक्स मस्तीला मिळाला होता. पण आता तीच सगळी माहिती आणि बातम्या लोकांना लोकमत मनोरंजनवर वाचायला मिळणार आहेत.

लोकमत मनोरंजन सीएनक्स मस्तीपेक्षा काही पाऊले पुढेच असणार आहे. कारण येथे बातम्यांसोबतच तुमच्या आवडत्या कलाकारांचे फोटो, त्यांच्या कुटुंबियांचे फोटोदेखील पाहायला मिळणार आहेत. तसेच सीएनक्स मस्तीपेक्षाही अधिक वेगाने बातम्या लोकांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत. 

करिनाच्या तैमुरपासून ते दीपिका पादुकोण-रणवीरची प्रत्येक अपडेट लोकमत मनोरंजनवर लोकांना मिळणार आहे. एवढेच नव्हे तर बिग बॉस मराठीचा सध्या चांगलाच बोलबाला आहे. याच बिग बॉस मराठीतील स्पर्धकांचे एक्सक्ल्युझिव्ह व्हिडिओ, त्यांच्याबद्दलची माहिती लोकमत मनोरंजनच्या वाचकांना मिळणार आहे. तसेच मराठी चित्रपट, मालिका यांच्या सेटवर काय काय घडते, त्यांच्यातील मजा मस्ती सगळे काही प्रेक्षकांना या व्हिडिओद्वारे जाणून घेता येणार आहे. एन्टरटेन्मेंटच्या जगतात काय सुरू आहे याची इत्यंभूत माहिती लोकमत मनोरंजन लोकांपर्यंत पोहोचवणार आहे.


Web Title: CNX Masti Is Now Lokmat Manoranjan
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.