‘बाहुबली’ची ‘कोटी’च्या कोटी उड्डाणे

By Admin | Published: July 15, 2015 10:41 PM2015-07-15T22:41:19+5:302015-07-16T05:57:38+5:30

भारतातील सगळ्यात खर्चिक चित्रपट म्हणून ‘बाहुबली’ चित्रपटाची वर्णी लागली. तो एकाच वेळी चार भाषांमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटांच्या इतिहासात पहिल्या दोन दिवसांतच

'Bahubali' crore crore flights | ‘बाहुबली’ची ‘कोटी’च्या कोटी उड्डाणे

‘बाहुबली’ची ‘कोटी’च्या कोटी उड्डाणे

googlenewsNext

भारतातील सगळ््यात खर्चिक चित्रपट म्हणून ‘बाहुबली’ चित्रपटाची वर्णी लागली. तो एकाच वेळी चार भाषांमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटांच्या इतिहासात पहिल्या दोन दिवसांतच १०० कोटी रुपयांचा व्यवसाय करणारा हा पहिलाच चित्रपट ठरला आहे. ‘बाहुबली’ चे दिग्दर्शक एस. एस. राजामौली असून, ज्या चार भाषांत हा चित्रपट तयार झाला त्या सगळ््याच भाषांत त्याची बॉक्स आॅफीसवरील कमाई जोरात झाली आहे. प्रदर्शित झाल्याच्या पहिल्याच दिवशी त्याने ५० कोटी रुपयांचा व्यवसाय केला. दुसऱ्या दिवशीही त्याचा व्यवसायाचा घोडा असाच धावत राहिला. शनिवारी त्याची कमाई ही ५० कोटींपेक्षा जास्त झाली. एकूण पाच दिवसांत २१५ कोटींची कमाई या चित्रपटाने केली आहे. केवळ हिंदी भाषेचा विचार केला तर (बाहुबली हिंदी भाषेत डब करण्यात येऊन प्रदर्शित झाला आहे़) मुंबई आणि हिंदी भाषिक राज्यांतील मल्टिप्लेक्सेसमध्ये याला चांगला प्रतिसाद मिळत असून, प्रत्येक जण त्यात वापरण्यात आलेल्या तंत्रज्ञानाचा चाहता बनला आहे. दिग्दर्शक राजमौली यांनी प्रेक्षकांचे हृदयच जिंकले आहे.
दक्षिणेत या चित्रपटाचे एवढे आकर्षण आहे, की चित्रपटाची अ‍ॅडव्हान्स बुकिंगपासून ते चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटगृहांबाहेर जमलेल्या प्रेक्षकांना आवरण्यासाठी पोलिसांना खूपच प्रयत्न करावे लागले. पहिल्या दोन दिवसांतच १०० कोटी रुपयांची कमाई करून १०० कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या क्लबमध्ये दाखल होऊन याने नवीन विक्रमच स्थापन केला आहे. पहिल्या आठवड्यात तब्बल १६५ कोटी रुपयांचा गल्ला जमवून या चित्रपटाने नवनवे विक्रम स्थापन केले आहेत. पहिला आठवडा संपताना १६५ कोटी रुपयांची कमाई करणारा पहिलाच चित्रपट ठरला आहे. जाणकार सांगतात की या १६५ कोटी रुपयांमध्ये बाहुबलीने विदेशात ४५ कोटी रुपये मिळविले, तर त्याची एकूण कमाई २०० कोटी रुपयांपेक्षाही पुढे जाते. या चित्रपटावर एकूण खर्च झाला आहे तो २५० कोटी रुपये. भारतीय बाजारातूनच हा चित्रपट पहिल्या आठवड्याच्या शेवटी २०० कोटी रुपये कमाईचा नवा विक्रम स्थापन करील व त्याच्या एकूण कमाईचा गल्ला ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल, असा जाणकारांचा व्होरा आहे.
बाहुबलीबरोबर प्रदर्शित झालेला टी सीरिजचा ‘आय लव्ह एनवाय’ नेमका कुठे आहे, हे कोणालाही समजले नाही. सनी देओल आणि कंगना राणावतसारखे नामवंत कलावंत असूनही त्याला काही प्रभाव पाडता आलेला नाही. पहिला आठवडा संपताना त्याने जवळपास १ कोटींचा गल्ला जमवला.
या आधी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचा विचार केला तर सुभाष कपूर यांनी दिग्दर्शित केलेला ‘गुड्डू रंगीला’ बॉक्स आॅफीसवर आदळला. पहिला आठवडा संपताना त्याने ५ कोटींचा व्यवसाय केला; परंतु नंतरच्या सात दिवसांत त्याला फक्त २ कोटीच गोळा करता आले. एकूण त्याची कमाई ७ कोटींचीच झाली. वरुण धवन आणि श्रद्धा कपूर यांच्या भूमिका असलेला ‘एबीसीडी २’ हा ‘तनु वेड्स मनु रिटर्न’नंतर १०० कोटी रुपयांची कमाई करणारा हा या वर्षीचा दुसरा चित्रपट ठरला आहे. बॉक्स आॅफीसवर त्याची आतापर्यंतची कमाई ही १०५ कोटींची झाली आहे.
येत्या शुक्रवारी सलमान खानची भूमिका असलेल्या व ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या ‘बजरंगी भाईजान’ची चाहत्यांना भेट आहे. ईद नेहमीच सलमानसाठी लकी ठरली आहे. ‘बजरंगी भाईजान’ सलमानला ३०० कोटी रुपये कमाईच्या क्लबमध्ये घेऊन जाईल, असे समजले जात आहे. या चित्रपटाबरोबर प्रथमच पाकिस्तानी चित्रपटही प्रदर्शित होत आहे.

Web Title: 'Bahubali' crore crore flights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.