Apologise For What Vivek Oberois Response To Aishwarya Rai Meme Row ncw sends legal notice | मी चुकलोच नाही, विवेक ओबेरॉय 'त्या' ट्विटवर ठाम; बॉलिवूडचं शरसंधान
मी चुकलोच नाही, विवेक ओबेरॉय 'त्या' ट्विटवर ठाम; बॉलिवूडचं शरसंधान

मुंबई: मी काहीही चुकीचं केलेलं नाही. मेम शेअर करण्यात गैर काय, असं म्हणत अभिनेता विवेक ओबेरॉयनं त्याच्या ट्विटचं समर्थन केलं आहे. अनेक जण मला माफी मागण्यास सांगत आहेत. माफी मागण्यात मला काहीही गैर वाटत नाही. पण मी काही चुकीचं केलं आहे, असं मला वाटत नाही, असं विवेक म्हणाला. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा पती अभिषेक बच्चन आणि कन्या आराध्या बच्चन सोबतचा फोटो आक्षेपार्ह मजूकरासह वापरल्यानं विवेकाला राष्ट्रीय महिला आयोगानं नोटीस बजावली आहे. बॉलिवूडमधील कलाकारांनीदेखील विवेकवर सडकून टीका केली आहे. 
मी केवळ मेम शेअर केलं. त्यावरुन इतका गदारोळ करण्याची गरज काय, अशा शब्दांमध्ये विवेकनं ट्विटचं समर्थन केलं. 'कोणीतरी मला मेम पाठवलं. त्यात माझी खिल्ली उडवण्यात आली होती. मी त्यावर हसलो आणि त्या माणसाच्या सर्जनशीलतेचं कौतुक केलं. कोणीतरी तुमची खिल्ली उडवत असेल, तर तुम्ही ते गांभीर्यानं घ्यायला नको. ज्या व्यक्ती त्या मेममध्ये आहेत, त्यांना कोणतीही अडचण नाही. उगाच काही नेते त्यावरुन वाद निर्माण करत आहेत. त्यांना माझा चित्रपट रोखता आला नाही. त्यामुळे आता त्यांच्याकडून हा प्रयत्न सुरू आहे,' असं विवेक म्हणाला. महिला आयोगाच्या नोटिशीला उत्तर देऊ, असंदेखील त्यानं सांगितलं. 'मी राष्ट्रीय महिला आयोग, राज्य महिला आयोगाच्या नोटिशीची वाट पाहतो आहे. मला त्यांना भेटायला, माझी बाजू स्पष्ट करायला आवडेल. मी काहीही चुकीचं केलेलं नाही. त्यामुळे मी स्पष्टीकरण देऊ शकतो', असं विवेकनं म्हटलं.
विवेकनं केलेल्या ट्विट केलेल्या फोटोत तीन भाग आहेत. ओपिनियन पोल, एक्झिट पोल आणि रिझल्ट असे फोटोचे तीन भाग आहेत. यातील ओपिनियन पोल लिहिलेल्या भागात ऐश्वर्या रॉय बच्चनचा सलमान खानसोबतचा फोटो आहे. तर एक्झिट पोलमध्ये ऐश्वर्याचा विवेकसोबतचा आणि रिझल्टमध्ये पती अभिषेक आणि मुलगी आराध्यसोबतचा फोटो आहे. विवेकच्या या ट्विटवर बॉलिवूडनं टीका केली आहे. अभिनेत्री सोनम कपूर, उर्मिला मांतोडकर, निर्माते मधूर भांडारकर यांनी तोंडसुख घेतलं आहे. 


Web Title: Apologise For What Vivek Oberois Response To Aishwarya Rai Meme Row ncw sends legal notice
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.