Amitabh Bachchan's Twitter Hack, Imran Khan's Photo of Big B | अमिताभ बच्चन यांचं ट्विटर हॅक, बिग बींच्या प्रोफाईलवर इम्रान खानचा फोटो
अमिताभ बच्चन यांचं ट्विटर हॅक, बिग बींच्या प्रोफाईलवर इम्रान खानचा फोटो

मुंबई - बॉलिवूडचा शहंशाह बिग बी अमिताभ बच्चन यांचं ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आलं आहे. हॅकरने अमिताभ यांच्या ट्विटर अकाऊंटवरील प्रोफाईल फोटोही बदलला असून अमिताभ यांच्याऐवजी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो दिसत आहे. तसेच, अकाऊंटवरुन पाकिस्तानशी संबंधित मसेजही शेअर करण्यात आला आहे. 

अमिताभ यांच्याकडून ट्विटरवर एक पोस्ट पिन करण्यात आली आहे. त्यामध्ये, माझ्या ट्विटर अकाऊंटवर सायबर अटॅक झाल्याचे म्हटले आहे. अमिताभ यांच्या अकाऊंटवरुन इम्रान खान यांचे फोटो शेअर करण्यात येत असून लव्ह पाकिस्तान असे मेसेजही शेअर करण्यात येत आहेत. टर्कीश सायबर आर्मीकडून हे अकाऊंट हॅक केल्याची प्राथमिक माहिती आहे. अमिताभ यांच्या ट्विटर अकाऊंटला 37.4 मिलियन्स म्हणजेच 3 कोटी 70 लाख 40 हजार फॉलोवर्स आहेत. दरम्यान, सद्यस्थिती कुणीही चाहत्यांनी अमिताभ यांच्या टविटर अकाऊंटवरील पोस्टला लाईक किंवा कमेंट करणे धोकादायक आहेत. त्यामुळे या पोस्ट रिट्विट करु नये.  

 


Web Title: Amitabh Bachchan's Twitter Hack, Imran Khan's Photo of Big B
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.