VIDEO : अल्लू अर्जुन आणि चिरंजीवीचा निहारिकाच्या मेहंदीतील कडक डान्स, पुन्हा पुन्हा बघताहेत लोक....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2020 12:27 PM2020-12-09T12:27:41+5:302020-12-09T12:28:18+5:30

निहारिकाच्या मेहंदीचे आणि संगीतचे फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नुकताच अल्लू अर्जुन आणि चिरंजीवीचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. 

Allu Arjun and Chiranjeevi dance in Niharika Konidela Mehendi ceremony video goes viral | VIDEO : अल्लू अर्जुन आणि चिरंजीवीचा निहारिकाच्या मेहंदीतील कडक डान्स, पुन्हा पुन्हा बघताहेत लोक....

VIDEO : अल्लू अर्जुन आणि चिरंजीवीचा निहारिकाच्या मेहंदीतील कडक डान्स, पुन्हा पुन्हा बघताहेत लोक....

googlenewsNext

अल्लू अर्जुन आणि चिरंजीवीसारखे अनेक मोठे स्टार सध्या साउथमधील अभिनेत्री निहारिका कोनिडेलाच्या लग्नासाठी उदयपूरमध्ये आहेत. निहारिका कोनिडेलाचं डेस्टीनेशन वेडींग उदयपूरच्या पॅलेसमध्ये होत आहे. इथे साउथमधील अनेक स्टार आले आहेत. निहारिकाच्या मेहंदीचे आणि संगीतचे फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नुकताच अल्लू अर्जुन आणि चिरंजीवीचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. 

अल्लू अर्जुन आणि चिरंजीवीचा हा व्हिडीओ त्यांच्या फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओत बघू शकता की, दोघेही बांगरू कोडी पेट्टा गाण्यावर डान्स करत आहेत. या गाण्यावर डान्स करताना अल्लू अर्जुन चिरंजीवीची डान्स स्टेप करतो तर यात चिरंजीवीही त्याला साथ देतो. दोघांच्या सोबतच्या या व्हिडीओचं लोक भरभरून कौतुक करत आहेत.

प्रसिद्ध अभिनेत्री निहारिका कोनिडेलाचं लग्न राजस्थानच्या उदयपूरमधील उदय विलास पॅलेसमध्ये होत आहे. निहारिकाने बिझनेसमन चैतन्य जोंनालागद्दाला आपला जोडीदार म्हणून निवडलं आहे. निहारिकाच्या लग्नात अल्लू अर्जुन परिवारासोबत पोहोचला होता. तसेच चिरंजीवी आणि रामचरण, मेहर रमेश, ऋतु वर्मा आणि लावण्या त्रिपाठीसारखेही कलाकारही लग्नाला पोहोचले आहेत. निहारिका आणि चैतन्यचं लग्न आज म्हणजे ९ डिसेंबरला होणार आहे. 

Web Title: Allu Arjun and Chiranjeevi dance in Niharika Konidela Mehendi ceremony video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.