NEET परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी, 16 लाख विद्यार्थी निकालाच्या प्रतिक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 12:26 PM2021-10-28T12:26:24+5:302021-10-28T12:27:15+5:30

मुंबई उच्च न्यायालयाने दोन विद्यार्थ्यांच्या NEET निकालाला स्थगिती दिली होती. सुप्रीम कोर्टाने म्हटले की, 2 विद्यार्थ्यांमुळे इतर विद्यार्थ्यांचा निकाल रोखता येणार नाही. 16 लाख विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Supreme Court allows release of NEET exam results, 16 lakh students awaiting results | NEET परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी, 16 लाख विद्यार्थी निकालाच्या प्रतिक्षेत

NEET परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी, 16 लाख विद्यार्थी निकालाच्या प्रतिक्षेत

Next

नवी दिल्ली :सर्वोच्च न्यायालयाने NEET-UG चा निकाल जाहीर करण्यास हिरवा सिग्नल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 16 लाख निकाल जाहीर करण्यास परवानगी दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सुप्रीम कोर्टाने म्हटले की, 16 लाख विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. फक्त 2 विद्यार्थ्यांसाठी अख्या परीक्षेचा निकाल रोखता येणार नाही. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर आता लवकरच NEET-UG 2021 चा निकाल जाहीर होणार आहे. निकालाची तारीख लवकरच जाहीर केली जाईल.

सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव यांनी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सांगितले की, निकाल रोखता येणार नाही, या मुद्दयाशी आमही सहमत आहोत. परंतु या दोन विद्यार्थ्यांचे हितही जपले गेले पाहिजे, ते सोडले जाऊ शकत नाही. निरीक्षकाने चूक मान्य केली आहे, अशा परिस्थितीत लाखो विद्यार्थ्यांना निकालाच्या प्रतीक्षेत ठेवता येणार नाही. आम्ही तुम्हाला निकाल जाहीर करण्याची परवानगी देत आहोत. या दोन विद्यार्थ्यांच्या बाबतीत तुम्हाला मार्ग सापडावा लागेल. या दोन्ही विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर न्यायालयाने एनटीएला नोटीस बजावून त्यांचा जबाब मागवला आहे. त्यावर दिवाळीनंतर सुनावणी होईल.

NEET-UG परीक्षेच्या निकालाबाबत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. दोन विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती द्यावी, असे केंद्राने म्हटले. उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे चुकीचा आदर्श निर्माण होणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे संपूर्ण परीक्षेचा निकाल थांबला आहे. त्यामुळे निकाल जाहीर होण्यास उशीर झाल्यास एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएसएमएस, बीयूएमएस आणि बीएचएमएस या पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला विलंब होईल. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय अवाजवी फायदा घेण्याचा चुकीचा आदर्श ठेवेल.

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरन्यायाधीश एनव्ही रमण यांच्याकडे लवकर सुनावणीची मागणी केली होती. ते म्हणाले की, उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे NEET चा निकाल जाहीर करण्याला स्थगिती देण्यात आली आहे. वास्तविक, मुंबई उच्च न्यायालयाने दोन विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र NEET परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या दोन विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊनच निकाल जाहीर होणार आहे. गेल्या महिन्यात 12 सप्टेंबर रोजी देशभरात NEET परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत सुमारे 16 लाख उमेदवार सहभागी झाले होते. सोलापूर जिल्ह्यातील दोन विद्यार्थ्यांनी केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने हा आदेश दिला आहे, ज्यांनी पर्यवेक्षकाच्या निष्काळजीपणामुळे त्यांना परीक्षेदरम्यान पाठ्यपुस्तका आणि उत्तरपत्रिका न जुळलेल्या मिळाल्याची तक्रार केली होती.

त्यांना दिलेली चाचणी पुस्तिका आणि उत्तरपुस्तिका यांचा ताळमेळ बसत नसल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. उमेदवारांनी तत्काळ पर्यवेक्षकांना माहिती दिली असता, त्यांचे ऐकून घेतले नाही आणि गप्प बसले. यानंतर न्यायालयाने एनटीएला याचिकाकर्त्या वैष्णवी भोपळे आणि अभिषेक कापसे यांची फेरतपासणी करुन दोन आठवड्यात निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले. उच्च न्यायालयाने एनटीएला याचिकाकर्त्यांना पुनर्परीक्षेची तारीख आणि परीक्षा केंद्र 48 तास अगोदर कळवण्यास सांगितले आहे.

Web Title: Supreme Court allows release of NEET exam results, 16 lakh students awaiting results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.