एटीकेटी विद्यार्थ्यांसह फेरपरीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना प्रवेशाची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 06:45 AM2019-08-30T06:45:10+5:302019-08-30T06:45:13+5:30

अकरावी प्रवेश प्रक्रिया; एफसीएफएस टप्पा २ चे वेळापत्रक जाहीर, विद्यार्थ्यांसाठी ९७ हजार जागा उपलब्ध

Opportunity for admission to ATKT students and pass the test | एटीकेटी विद्यार्थ्यांसह फेरपरीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना प्रवेशाची संधी

एटीकेटी विद्यार्थ्यांसह फेरपरीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना प्रवेशाची संधी

Next

मुंबई : अकरावी प्रवेश प्रक्रियेतील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरीच्या (एफसीएफएस) पहिल्या टप्प्यातील तिन्ही प्रकारांची प्रवेश प्रक्रिया बुधवारी संपली. यानंतर आता दहावी फेरपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या, एटीकेटी पात्र विद्यार्थ्यांसाठी अकरावी आॅनलाइन प्रवेशाच्या एफसीएफएस टप्पा २ चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ही फेरी ३१ आॅगस्टपासून सुरू होऊन १७ सप्टेंबरपर्यंत चालेल.


प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य या तत्त्वावरच दुसºया टप्प्यातील प्रवेश दिले जातील. शुक्रवारी दहावी फेरपरीक्षेचा निकाल जाहीर होणार असून यामध्ये उत्तीर्ण विद्यार्थी या फेरीत सहभागी होऊ शकतील.
गुरुवारी अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर एटीकेटी विद्यार्थ्यांसाठी रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या. त्याचप्रमाणे अकरावी एफसीएफएस टप्पा २ साठी अकरावी आॅनलाइनच्या ९७,१५० जागा तर कोट्याच्या २५,७७१ जागा उपलब्ध आहेत. यात कला शाखेच्या १४,०४६, वाणिज्यच्या ४०,८८१, विज्ञान शाखेच्या ३९,८५८, एचएसव्हीसीच्या २,३६८ रिक्त जागांचा समावेश आहे. कोट्याच्या २५,७७१ जागांमध्ये अल्पसंख्याकांच्या १३,४६३, इनहाउसच्या ४,८३८ तर व्यवस्थापन कोट्याच्या ७,४७० जागा आहेत.

हे विद्यार्थी होऊ शकतील सहभागी
एफसीएफएस टप्पा २ मध्ये आतापर्यंत कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश न घेतलेले विद्यार्थी, या फेरीपूर्वी प्रवेश रद्द केलेले, या फेरीपूर्वी प्रवेश नाकारलेले, एटीकेटी सवलतधारक, राज्य मंडळाच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेले तसेच राज्य मंडळाच्या फेरपरीक्षेतील एटीकेटी सवलतधारक विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. एफसीएफएस टप्पा २ फेरीमधील प्रवेशांसाठी विद्यार्थ्यांचे खालील प्रकारांत वर्गीकरण करण्यात आले आहे.
प्रथम आॅनलाइन क्लिक करणाºयास प्रथम प्रवेश
च्रिक्त जागा, गुणवत्तेचा प्रकार व विद्यार्थ्याने आॅनलाइन पद्धतीने नोंदविलेली वेळ यानुसार प्रथम आॅनलाइन क्लिक करणाºयास प्रथम प्रवेश यानुसार प्रवेश होणार आहेत. ३१ आॅगस्ट रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ पर्यंत विद्यार्थ्यांना आॅनलाइन लिंक उपलब्ध करून दिली जाईल.
च्यामध्ये पूर्वी घेतलेला प्रवेश रद्द करता येतील. त्यासह नवीन अर्ज करणे, अर्ज निश्चिती करण्याची प्रक्रिया पूर्ण करता येतील. फेरपरीक्षा, एटीकेटी पात्र विद्यार्थ्यांना जवळच्या मार्गदर्शन केंद्रावरून नवीन माहिती पुस्तिका घेऊन लॉगइन आयडी व पासवर्डच्या साहाय्याने आॅनलाइन अर्ज भाग-१ पूर्ण करता येईल.

च्आधीचे प्रवेश रद्द करणे - ३१ आॅगस्ट.
च्३ ते ७ सप्टेंबर - नवीन अर्ज करणे, त्यांची निश्चिती करणे आणि अपूर्ण अर्ज पूर्ण करणे.
च्७ सप्टेंबर - पहिल्या प्रकारातील विद्यार्थ्यांसाठी रिक्त जागांची यादी.
च्९ सप्टेंबर - पहिल्या प्रकारातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालय निवडणे.
च्९ ते ११ सप्टेंबर - प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयात निश्चिती करणे.
च्११ सप्टेंबर - दुसºया प्रकारातील विद्यार्थ्यांसाठी रिक्त जागांची यादी.
च्१३ सप्टेंबर - दुसºया प्रकारातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालय निवडणे.
च्१३ ते १४ सप्टेंबर - दुसºया प्रकारात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयात निश्चिती करणे.
च्१४ सप्टेंबर - पहिल्या प्रकारातील विद्यार्थ्यांर्साठी रिक्त जागांची यादी.
च्१६ सप्टेंबर - तिसºया प्रकारातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालय निवडणे.
च्१६ ते १७ सप्टेंबर - तिसºया प्रकारात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयात प्रवेश निश्चिती करणे.
च्१७ सप्टेंबर - रिक्त जागांचा तपशील आॅनलाइन जाहीर
होणार.

पहिला प्रकार - (६० टक्क्यांहून अधिक गुण असलेले विद्यार्थी) - दहावीच्या परीक्षेमध्ये ६० टक्के आणि त्याहून अधिक गुण प्राप्त केलेले विद्यार्थी या प्रकारामध्ये अर्ज करू शकतील.
दुसरा प्रकार - (दहावी उत्तीर्ण सर्व विद्यार्थी) - दहावी उत्तीर्ण विद्यार्थी शिवाय पहिल्या प्रकारात ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले नाहीत असे विद्यार्थीही यात सहभागी होऊ शकतील.
तिसरा प्रकार - (राज्य मंडळाचे एटीकेटी विद्यार्थी) - राज्य मंडळाच्या फेरपरीक्षेतील एटीकेटी सवलतधारक विद्यार्थी आणि पहिल्या व दुसºया प्रकारात सहभागी न झालेले विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतील.

Web Title: Opportunity for admission to ATKT students and pass the test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.