CBSE Exam Datesheet 2021 Examinations for 10th and 12th class students will start from 4th May till 10th june | CBSE Exam Datesheet 2021:वेळापत्रक जाहीर, ४ मेपासून १०वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा

CBSE Exam Datesheet 2021:वेळापत्रक जाहीर, ४ मेपासून १०वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा

ठळक मुद्दे१ मार्चपासून होणार प्रॅक्टिकल परीक्षांना सुरूवात१५ जुलैपर्यंत निकाल लागणार

CBSE नं १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांची डेटशीट जारी केली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षांचं वेळापत्रक  cbse.gov.in या संकेतस्थळांवर पाहता येणार आहे. डेटशीटवरून कोणत्या दिवशी कोणता पेपर आहे याची माहिती विद्यार्थ्यांना मिळणार आहे. सीबीएसईच्या १० वी आणि १२ वीच्या परीक्षा ४ मे पासून सुरू होणार असून त्या १० जूनपर्यंत सुरू राहतील. तसंच विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकल परीक्षा १ मार्च पासून घेण्यात येणार आहेत. तसंच परीक्षांचे निकालही १५ जुलैपर्यंत लावण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ही डेटशीट जारी केली. तसंच विद्यार्थी परीक्षांच्या तयारीला लागले असतील याचा आपल्याला पूर्ण विश्वास आहे, असंही ते म्हणाले. "आम्ही यापूर्वीच ४ मे पासून परीक्षा घेण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं. विद्यार्थ्यांना तयारीसाठीही बराच कालावधी मिळालला आहे. मला अशा आहे की तुम्ही वेळेचा य़ोग्य उपयोग करत असाल," असंही शिक्षणमंत्री म्हणाले. पोखरियाल यांनी २८ जानेवारी २०२१ रोजी सीबीएसईच्या शाळांच्या मुख्याध्यापकांशी संवाद साधला होता. तसंच त्यावेळी त्यांनी बोर्ड २ फेब्रुवारी रोजी १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांचं वेळापत्रक जाहीर करणार असल्याचं सांगितलं होतं. यावेळी ३८ दिवसांच्या आत १० वी आणि १२ वीच्या सर्व विषयांच्या परीक्षांचं आयोजन करण्यात आलं आहे. सर्व शाळांनी प्रॅक्टिकल परीक्षा, प्रोजेक्ट आणि अंतर्गत मूल्यांकन प्रक्रिया विद्यार्थ्यांची परीक्षा पूर्ण होण्यापूर्वीच करण्याचे निर्देश सीबीएसईनं दिले आहेच. तसंच वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळांवर माहिती दिली जाणार आहे. सोशल मीडियासहित अन्य कोणत्याही माध्यमांवरील माहिती तोवर सत्य मानू नये जोवर ती माहिती बोर्डाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होईल, असं आवाहनही बोर्डाकडून करण्यात आलं आहे. 

सीबीएसईच्या सर्व परीक्षा गृहमंत्रालयाच्या आणि आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच घेण्यात येतील. तसंत चर्चेच्या आधारे मार्गदर्शक सूचना ठवण्यात येतील आणि त्या नंतर आरोग्य मंत्रालय आणि गृह मंत्रालयाद्वारे निश्चित केल्या जाणार असल्याचंही शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं.

Web Title: CBSE Exam Datesheet 2021 Examinations for 10th and 12th class students will start from 4th May till 10th june

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.