बिंज वॉचिंगच्या जाळ्यात पाय फसला आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 05:21 AM2021-05-27T05:21:47+5:302021-05-27T05:21:55+5:30

Binge Watching: OTT चॅनल्सच्या व्यसनात बिंज वॉचिंग हा महत्त्वाचा घटक असतो. तरुण, मध्यमवयीन, ज्येष्ठ नागरिक यांच्याबरोबर आता लहान मुलांनाही बिंज वॉचिंगची सवय लागते आहे.

Trapped in a Binge Watching Trap? | बिंज वॉचिंगच्या जाळ्यात पाय फसला आहे?

बिंज वॉचिंगच्या जाळ्यात पाय फसला आहे?

Next

- मुक्ता चैतन्य  
(muktaachaitanya@gmail.com)
तुम्ही ऑनलाईन गेल्यानंतर काय काय करता? सोशल मीडिया, यु ट्यूब, न्यूज पोर्टल्स या गोष्टी तर आहेतच पण त्या व्यतिरिक्त काय करता?
आपल्यापैकी अनेक जण OTT चॅनल्सवर बराच वेळ घालवत असतात.  अनेकदा आपल्या ऑनलाईन वावरात OTT चॅनल्सवरचा आपला स्क्रीन टाइम आपण लक्षात घेत नाही, किंवा तोही मोजला पाहिजे हेच जाणवत नाही. पण आपल्या एकूण स्क्रीन टाईमचा बराचसा भाग या OTT प्लॅटफॉर्म्सनी व्यापलेला असतो. OTT म्हणजे ओव्हर द टॉप. नेटफ्लिक्स, प्राईम, हॉटस्टार, वुट, सोनी लिव्ह आणि अशी जी अगणित चॅनल्स आहेत त्यांना OTT म्हटलं जातं.

OTT चॅनल्सच्या व्यसनात बिंज वॉचिंग हा महत्त्वाचा घटक असतो. तरुण, मध्यमवयीन, ज्येष्ठ नागरिक यांच्याबरोबर आता लहान मुलांनाही बिंज वॉचिंगची सवय लागते आहे. स्वस्त डाटा, स्वतःचं गॅजेट आणि सतत ऑनलाईन झालेलं जगणं या मिश्रणामुळे OTT ॲडिक्शन ज्याला बिंज वॉचिंग सिंड्रोम किंवा नेटफ्लिक्स ॲडिक्शन असंही म्हटलं जातं.

बिंज वॉचिंग सिंड्रोममध्ये घडतं काय?
हल्ली विकेंड बिंज वॉचिंग हा प्रकार खूप प्रसिद्ध आहे. यात माणसं शुक्रवार रात्रीपासून सोमवार पहाटेपर्यंत अधून मधून ब्रेक्स घेत सलग काही तास OTT चॅनल्सवरच्या सिरिअल्स आणि सिनेमे बघत असतात. आपल्याकडे पहिली बिंज वॉचिंग सिंड्रोमची केस बंगळुरूच्या निमहांस या संस्थेत दाखल झाली होती. एका २६ वर्षांच्या बेरोजगार मुलाने आपण फार जास्त वेळ OTT चॅनल्स बघतोय आणि त्यापासून दूर राहता येत नाही हे जाणवून स्वतःला व्यसनमुक्तीसाठी ॲडमिट करून घेतलं आणि हा नवा मानसिक आजार पुढे आला. 

अनेक संशोधकांच्या मते ड्रग किंवा सेक्स ॲडिक्शन इतकंच हे गंभीर असू शकतं कारण माणसं बाकी जगणं सोडून देऊन फक्त सिरिअल्स आणि सिनेमे बघत बसतात. मुळात बिंज वॉचिंग सिंड्रोममध्ये आपण काहीतरी इंटरेस्टिंग/ महत्त्वाचं बघतोय असं वाटत राहतं आणि मूड आनंदी होतो. ज्यामुळे मेंदूत प्रचंड प्रमाणात डोपामिन स्त्रवते. ज्यामुळे अर्थातच तोच आनंद मिळण्यामागे बघणारा लागतो आणि मग पुढे थांबताच येत नाही. पुढच्या भागात: बिंज वॉचिंग सिंड्रोममधून बाहेर पडायचं कसं?

Web Title: Trapped in a Binge Watching Trap?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.