दृष्टिकोन - चित्रपटांमागील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे नवे निकष

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2019 01:29 AM2019-09-03T01:29:34+5:302019-09-03T06:03:36+5:30

हॉलीवुडच्या बहुचर्चित अव्हेंजर्स, अवतार, आयर्न मेन २, मेट्रिक्ससारखे उच्चतम स्पेशल इफेक्ट आपल्याला

The latest technology for cutting edge technology | दृष्टिकोन - चित्रपटांमागील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे नवे निकष

दृष्टिकोन - चित्रपटांमागील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे नवे निकष

Next

दीपक शिकारपूर

प्रभासचा साहो हा बिगबजेट चित्रपट सध्या बहुचर्चित आहे. बाहुबलीनंतर सर्वच प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोचली आहे. या चित्रपटासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर केलेला खर्च कोट्यवधीच्या घरात आहे. एकाच वेळी हिंदी, तामिळ आणि तेलगू भाषांमध्ये याचे चित्रीकरण केले गेले आहे. एकेकाळी ‘चित्रपट कला की शास्त्र’ या विषयावरवर वादविवाद होत असत. जास्त कला व थोडेफार तंत्र हे विसाव्या शतकापर्यंतचे चित्र होते. २0१९ नंतर हे गृहीतक पूर्णपणे बदलणार आहे असे दिसते.

हॉलीवुडच्या बहुचर्चित अव्हेंजर्स, अवतार, आयर्न मेन २, मेट्रिक्ससारखे उच्चतम स्पेशल इफेक्ट आपल्याला भारतीय चित्रपटांत पाहायला मिळतील. चित्रपटासाठी अ‍ॅक्शन दिग्दर्शित करणाऱ्या ‘ट्रान्सफॉर्मर्स’ या हॉलिवूड चित्रपटाच्या तंत्रज्ञांना खास पाचारण केले गेले. चांगली कथा, सकस कलाकार हे चित्रपट यशस्वी करण्यासाठी नक्कीच अत्यावश्यक आहेत. पण ते विश्वासार्ह पद्धतीने सादर केले पाहिजे आणि ते विश्वासार्ह बनवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे शक्तिशाली आणि चांगल्या प्रतीचे व्हिज्युअल इफेक्ट्स. चलतचित्रपटात काही तंत्र चमत्कार निर्माण करून जे नाही ते दाखवणे याला स्पेशल इफेक्ट म्हणून संबोधले जाते. शूटिंग करताना (विशेषत: हाणामारी) अनेक यांत्रिकी तंत्रज्ञान वापरून वातावरण निर्मिती (पाऊस, धुके, बर्फ, ऊन), इमारती जमीनदोस्त होणे, वाहने नष्ट अथवा वेडीवाकडी होणे, त्याचबरोबर अभिनेत्याचे बाह्य स्वरूप बदलणे अशा अनेक बाबींचा समावेश होतो.

कॉम्प्युटर जनरेटेड इमेज हे तंत्रज्ञान सर्रास अनेक ठिकाणी वापरले जाते. एकूण निर्माण होणाऱ्या ७0 टक्के सिनेमात या ना त्या मार्गांनी तंत्रज्ञान हे जरूर वापरले जाते. आभासी प्रतिमा हुबेहूब दाखवायचे काम त्यामुळे सहज शक्य होते. संगणकावर एखादे नवीन पात्र निर्माण करून ते कार्टूनसारखे दाखवणे हा त्यातील पहिला टप्पा. त्यानंतर हाडामासाचे पात्र व आभासी पात्र एकत्र करायचा टप्पा पार केला गेला. काही वेळा हाडामाणसाच्या पात्राचे काही अवयव संगणकीय केले गेले. साहोसाठी हॉलीवूडच्या अ‍ॅक्शन कोरियोग्राफर केनी बेट्सची १२0 हून अधिक लोकांची अ‍ॅक्शन टीमसह ८0 सदस्यीय कॅमेरा टीम शूटसाठी योजना आखण्यासाठी आणि तयारीसाठी एकत्र काम केले. अतिवेगवान पाठलागाच्या शूटिंगचे कंपन टाळण्यासाठी कॅमेरे खास डिझाइन केलेले आहेत. मोटर सायकलच्या वेगानेच कॅमेरेही एका इव्हो या विशिष्ट वाहनात बसवले होते. आठ मिनिटांच्या पाठलाग व हाणामारीचे ७0 कोटींचे बजेट हा एक उच्चांकच म्हणावा लागेल. त्याचबरोबर एका आभासी शहराची निर्मिती हे अजून एक वैशिष्ट्य. बॅटमॅनमध्ये जसे गोथॅम हे काल्पनिक शहर वसवले तसेच शहर अबू धाबीच्या पाशर््वभूमीवर निर्माण केले गेले आहे. व्हिज्युअल इफेक्ट आर्टिस्ट आणि डिजिटल कंपोझटिरसह ३00 कलाकारांची टीम यासाठी अथक परिश्रम घेत होती. आवर्त-संचित इमारती आणि निओ-फ्यूचरिस्ट आर्किटेक्चरल स्ट्रक्चर्स यासाठी खास निर्मिली गेली.
एवढा मोठा खटाटोप करून निर्माण केलेल्या साहोला खरे किती यश व मानसन्मान मिळतील हे काळच ठरवेल. पण काही नाही तरी उच्च तंत्रज्ञान वापराबाबत नवीन निकष निर्माण करायचे महतकार्य भारतीय सिनेमाच्या इतिहासात त्यांनी नक्की केले आहे.
 

(लेखक संगणक साक्षरता प्रसारक आहेत )
 

Web Title: The latest technology for cutting edge technology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.